Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

CNG Price : तुम्ही सीएनजीवर चालणारे वाहन चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काळाज इंधनदरात वाढ होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 02:40 PM2024-10-20T14:40:32+5:302024-10-20T14:42:15+5:30

CNG Price : तुम्ही सीएनजीवर चालणारे वाहन चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काळाज इंधनदरात वाढ होऊ शकते.

CNG price may go up Rs 4 to 6 on supply cut, excise duty reduction to ease | महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

CNG Price : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सरकारने शहरी किरकोळ पुरवठादारांना स्वस्त सीएनजीचा पुरवठा कमी केला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात ४ ते ६ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मात्र, सरकार उत्पादन शुल्कात कपात करून सीएनजीच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारने नैसर्गिक वायूचा पुरवठा २० टक्क्यांनी कमी केला आहे.

गॅस पुरवठ्यात कपात
अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत नैसर्गिक वायूचा पुरवठा जमिनीखालून आणि समुद्रतळातून पाईपद्वारे भारताला केला जातो. हा नैसर्गिक वायू एक प्रकारचा कच्चा माल आहे. याचे रुपांतर सीएनजीमध्ये करुन ऑटोमोबाईल तर एलपीजी घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस म्हणून वापरला जातो. लेगेसी फील्डमधून उत्पादित होणारा गॅस शहरांमधील किरकोळ गॅस पुरवठादारांना पाठविला जातो. हा पुरवठा दरवर्षी ५ टक्क्यांनी कमी होत आहे. घरगुती एलपीजीचा पुरवठा स्थिर आहे, त्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता नाही. परंतु, पुरवठादारांकडून कमी गॅसचा पुरवठा होत असल्याने त्यांना महागडा सीएनजी घ्यावा लागत आहे. त्यामुळेच आगामी काळात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

सरकार सीएनजी दर नियंत्रित ठेवणार का?
महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार आहेत. तर काही महिन्यांत दिल्लीतही विधानसभा निवडणुका जाहीर होतील. अशा परिस्थितीत वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकार सीएनजीवरील उत्पादन शुल्कात कपात करू शकते. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये सीएनजीवर आधारित वाहनांची संख्या मोठी आहे. यामुळेच भाववाढीमुळे मतदारांचा रोष सरकारला परवडणारा नाही. अशा स्थितीत परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार उत्पादन शुल्क कमी करू शकते, अशीही चर्चा आहे.
 

Web Title: CNG price may go up Rs 4 to 6 on supply cut, excise duty reduction to ease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.