ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी EaseMyTrip चे सह-संस्थापक रिकांत पिट्टी यांनी गुरुग्राममध्ये जवळपास ९९.३४ कोटी रुपयांची व्यावसायिक कमर्शिअल प्रॉपर्टी खरेदी केली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ३२ मध्ये असलेल्या या प्रॉपर्टीचा करार ९९.३४ कोटी रुपयांना झाला आहे. रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सच्या मते, रिकांत पिट्टी यांनी २४ नोव्हेंबर रोजी स्वाक्षरी केलेल्या करारासाठी ६.९५ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही भरली. ही कमर्शिअल प्रॉपर्टी ४०५० चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे.पिट्टी यांनी गेल्या वर्षी लॅम्बोर्गिनी Urus Performante विकत घेतली आणि त्याच्या लिंक्डइन पेजवर त्याचे फोटोही शेअर केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, समूहाचे सीईओ राजेश मागो यांनी कथितरित्या सुमारे ३३ कोटी रुपयांना डीएलएफ मॅग्नोलियासमध्ये ६,४२८ चौरस फुटांचे अपार्टमेंट खरेदी केलं होतं.मालदीववरून चर्चेत आली कंपनीअलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. तेव्हा मालदीवच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर अपमानास्पद टिपण्णी केली होती. या वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. दरम्यान, ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी EaseMyTrip नं मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग थांबवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच लक्षद्वीपसह भारतातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यावर भर दिलाय. अलीकडेच, कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ, निशांत पिट्टी यांनी या विषयावर उघडपणे वक्तव्यही केलं होतं.२००८ मध्ये कंपनी अस्तित्वात आलीकंपनीच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर, ती २००८ मध्ये अस्तित्वात आली. निशांत पिट्टी, रिकांत पिट्टी आणि प्रशांत पिट्टी यांनी त्याची स्थापना केली होती. नोएडा, दिल्ली आणि गुरुग्राम व्यतिरिक्त, त्याची बंगळुरू आणि मुंबईसह भारतातील अनेक शहरांमध्ये कार्यालयं आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय कार्यालयं (उपकंपनीच्या रुपात) फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि न्यूझीलंड येथे आहेत. ही कंपनी प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगसह अनेक प्रकारच्या ऑफर प्रदान करते.
EaseMyTrip च्या को फाऊंडरची मोठी डील, ₹९९ कोटींमध्ये खरेदी केली प्रॉपर्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 11:53 AM