Join us

कोचिंग क्लासवर १८% जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:34 AM

विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेसना वस्तू व सेवाकरातून सूट देण्यात आलेली नाही. त्यांना १८ टक्के जीएसटी लागू आहे, असा निर्णय महाराष्ट्र अग्रीम निर्णय प्राधिकरणाने (एएआर) दिला आहे.

मुंबई - विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेसना वस्तू व सेवाकरातून सूट देण्यात आलेली नाही. त्यांना १८ टक्के जीएसटी लागू आहे, असा निर्णय महाराष्ट्र अग्रीम निर्णय प्राधिकरणाने (एएआर) दिला आहे.बोरीवली येथील सिंपल शुक्ला ट्युटोरियल्सच्या मालक सिंपल राजेंद्र शुक्ला यांनी याबाबत याचिका केली होती. शुक्ला यांनी याचिकेत म्हटले होते की, सरकारने जारी केलेल्या १२व्या अधिसूचनेत शैक्षणिक संस्था व विद्यार्थी यांना शून्य टक्के दराने जीएसटी लागेल, असे म्हटले होते. या कायद्यात ‘शैक्षणिक’ व ‘संस्था’ यांची व्याख्या नाही. कोणत्याही प्रकारे शैक्षणिक सेवा देणारी संस्था ही शैक्षणिक संस्थाच असते. या न्यायाने क्लासला जीएसटी लागत नाही.यावर प्राधिकरणाने म्हटले की, अधिसूचनेनुसार शालेय पूर्व व उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण देणाºया, मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाºया संस्थाच ‘शैक्षणिक संस्था’ व्याख्येत बसतात. कोचिंग क्लास यात बसत नाहीत.

टॅग्स :विद्यार्थीशिक्षण क्षेत्रबातम्या