Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोळशाच्या आयातीत १३.७ टक्के घसरण

कोळशाच्या आयातीत १३.७ टक्के घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आॅक्टोबर महिन्यात कोळशाची आयात १३.७ टक्के घसरून १५.५९ दशलक्ष टनांवर आली.

By admin | Published: November 7, 2016 12:21 AM2016-11-07T00:21:20+5:302016-11-07T00:21:20+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आॅक्टोबर महिन्यात कोळशाची आयात १३.७ टक्के घसरून १५.५९ दशलक्ष टनांवर आली.

Coal imports fall by 13.7% | कोळशाच्या आयातीत १३.७ टक्के घसरण

कोळशाच्या आयातीत १३.७ टक्के घसरण

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आॅक्टोबर महिन्यात कोळशाची आयात १३.७ टक्के घसरून १५.५९ दशलक्ष टनांवर आली. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात देशाने १८.०८ मेट्रिक टन कोळसा आयात केला होता, असे स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (सेल) आणि टाटा स्टीलने सांगितले. आॅक्टोबर २०१६मध्ये सर्व प्रकारच्या कोळशाची आयात १५.५९ दशलक्ष टन होती ती आॅक्टोबर २०१५मध्ये १८.०९ मेट्रिक टन तर सप्टेंबर २०१६मध्ये ती १५.५५ मेट्रिक टन होती. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी होतील या अपेक्षेने भारतीय खरेदीदारांनी उशीर लावल्याने कोळशाची आयात गेल्या आॅक्टोबरमध्ये कमी होती.

Web Title: Coal imports fall by 13.7%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.