Coal India Share: कोल इंडिया लिमिटेडचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर किरकोळ वधारून ५३४.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. याआधी बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या तेजीसह कोल इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या महिन्याभरात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारातील तज्ज्ञ या शेअरबाबत सकारात्मक असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजनं ६०० रुपयांच्या टार्गेट प्राईससह शेअरवर 'बाय' रेटिंग दिलं आहे.
काय आहे अधिक माहिती?
ब्रोकरेज कंपनीने आपल्या नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ई-लिलावाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. २०२५-२०२७ या आर्थिक वर्षाचा अंदाज वर्तवला जात आहे की, ई-लिलाव प्रीमियम जून तिमाहीत ५८% ते ५५-६०% असेल. भारतातील मजबूत आर्थिक विकासामुळे कोल इंडियाच्या चांगल्या विक्रीला चालना मिळेल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टनंही कोल इंडियावरील टार्गेट प्राइस ५५० रुपयांवरून वाढवून ६५० रुपये केली आहे. ब्रोकरेजनं आपल्या नोटमध्ये लिहिलंय की, कोल इंडिया हेल्दी वॉल्यूम वाढीसाठी तयार आहे. कोल इंडियाचा समावेश असलेल्या २६ एक्सपर्ट्सपैकी १९ एक्सपर्ट्सनी या शेअरला 'बाय' रेटिंग दिलं आहे, चार विश्लेषकांनी 'होल्ड'ची शिफारस केली आहे, तर तीन एक्सपर्ट्सनं 'विक्री'ची शिफारस केली आहे.
शेअरची स्थिती काय?
कोल इंडियाच्या शेअरमध्ये २०२४ मध्ये आतापर्यंत ३९ टक्के वाढ झाली आहे. या शेअरनं २०२१ पासून दरवर्षी पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे. या शेअरनं सहा महिन्यांत १५ टक्के आणि YTDमध्ये ३८ टक्के परतावा दिला आहे. त्यात वर्षभरात १३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कोल इंडियामध्ये एलआयसीचा ९.९८ टक्के हिस्सा आहे. एलआयसीकडे कंपनीचे ६१,५१,२३,९१६ शेअर्स आहेत.
(टीप : यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)