नवी दिल्ली : वृद्धीला चालना देणे आणि रोजगारनिर्मिती करणे यासाठी कोळसा, संरक्षण उत्पादने आणि हवाई क्षेत्रात संरचनात्मक सुधारणा (स्ट्रक्चरल रिफॉर्म्स) करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या २0 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची माहिती देण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत चौथी संयुक्त पत्रकार परिषद शनिवारी घेतली. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली. सीतारामन यांनी सांगितले की, चौथ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये कोळसा, खनिजे, संरक्षण उत्पादन, नागरी उड्डयन, केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्या, अवकाश आणि अणुऊर्जा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.हवाई क्षेत्र वापरावरील मर्यादा शिथिल करणार60% च भारतीय हवाई क्षेत्र सध्या वापरासाठी उपलब्ध आहे.अधिक हवाई क्षेत्र उपलब्ध झाल्यानंतर प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच इंधनाची बचत होईल. आणखी सहा विमानतळे खाजगी क्षेत्राच्या सहभागासाठी खुली केली जातील.12 विमानतळांचा लिलाव पहिल्या दोन टप्प्यांत करण्यात आला असून, त्यातून १३ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक उपलब्ध होणार आहे.विमानांचीदेखभाल, दुरुस्ती व कायापालट यावरील करव्यवस्था अधिकव्यवहार्य करण्यात आली.दुरुस्ती व देखभालक्षेत्र तीन वर्षांत800कोटींवरून२ हजार कोटींवर जाईल, अशी अपेक्षा आहे.49 टक्क्यांवरून ७४ टक्के थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला गती देण्यासाठी करण्यात येईल. काही शस्त्रास्त्रे व प्लॅटफार्मची आयात करण्यावर बंदी घालण्यात येईल. ही उपकरणे भारतातच बनविली जातील. काही आयात सुट्या भागांचे स्वदेशीकरण केले जाईल. यातून भारताचे संरक्षण आयात बिल कमी होण्यास मदत होईल.
कोळसा, अवकाश, अणुऊर्जा क्षेत्रात सुधारणा करणार- वित्तमंत्री निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 3:03 AM