नवी दिल्ली : वीजनिर्मिती क्षेत्राला सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमिटेडकडून (सीआयएल) होणारा कोळशाचा पुरवठा या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत ८.९ टक्क्यांनी घटून २९१.४ दशलक्ष टन झाला. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षी याच कालावधीत कोल इंडियाने ३२० दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा केला होता. कोल इंडिया लिमिटेड ही जगातील सगळ्यात मोठी खाण कंपनी आहे.
नोव्हेंबर महिन्यात कोळशाचा पुरवठाही ९.९ टक्क्यांनी खाली येऊन ३८.८ मेट्रिक टन झाला. नोव्हेंबर २०१८ मध्ये तो ४३.१ टन होता. सरकारी मालकीच्या सिंगारेनी कोलिरीज कंपनी लिमिटेडकडून (एससीसीएल) या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत होणारा कोळशाचा पुरवठाही १.७% घटून ३४.४ टन झाला. तो गेल्या वर्षी याच कालावधीत ३५ टन होता. एससीसीएलकडून होणारा कोळशाचा पुरवठा गेल्या नोव्हेंबर महिन्यात ६.१ टक्के घटून ४.६ टनांवर आला. तो गेल्या वर्षी ४.९ टन होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आम्ही कोळशाचे एक अब्ज टन उत्पादन करू, असेही कंपनीने म्हटले आहे, असे कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले. या कंपनीला ६६० दशलक्ष टन कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष्य दिले गेले आहे.पाऊस हा शत्रूचअधिकाºयाने पाऊस हा कोळसा विभागाचा शत्रू असल्याचे सांगून यंदा मान्सूनमुळे जुलै महिन्यापासून कोळशाच्या उत्पादनात घट झाल्याचे सांगितले.