कोका-कोला आणि रिअल मी या कंपन्यांनी एकत्र येत स्मार्टफोन लाँच करण्यात येत असल्याची घोषणा केली. कंपनीकडून पहिला कोका-कोला स्मार्टफोन लाँच करण्यात येत असल्याचे रिअल मी कडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं. Coca-Cola स्मार्टफोन Realme १० Pro ५G Coca-Cola Edition हा १० फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.३० pm वाजता ग्राहकांसमोर येणार आहे. या फोनच्या डिझाईन आणि ग्राहकांसाठी असलेल्या फिचर्संची संपूर्ण माहिती अद्याप समोर आली नाही.
कोका-कोला एडिशनमध्ये अल्ट्रा फास्ट १२०Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन ६९५ ५G प्रोसेसर देण्यात आला आहे. रिअल मी ने सुरुवातीपासूनच टेक्नॉलॉजी आणि डिझाइनच्या गुडरिव्हूवमुळे तरुणाईला आकर्षित करण्याच लक्ष्य ठेवलं आहे. ही एडिशनही त्याच उद्देशातून समोर आली आहे. उत्त्कृष्ट डिझाइन देण्यासाठीच कंपनीने जुना ब्रँड असलेल्या कोका-कोला कंपनीसोबत भागिदारी केली आहे.
Realme १० Pro ५G स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये पॉवर देण्याचं काम RAZR टेक्नॉलॉजी करत आहे. त्यामध्ये, १०८ MP चा प्रोलाइट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबतच फ्रंट १६ मेगा पिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. त्यामध्ये, फोटोग्राफी फीचर्ससारख्या सुपर ग्रुप पोर्ट्रेट, वन टेक आणि स्ट्रीट फोटोग्राफी मोड ३.० देण्यात आले आहेत. Realme १० Pro ५G हायपरस्पेस डिझाइन आणि 8८.१mm अल्ट्रा-स्लिम बॉडी, ५०००mAh बॅटरीसोबत ३३W डार्ट चार्ज आणि ड्यूअल स्पीकर्सही देण्यात आला आहे. दरम्यान, या फोनसाठी ६ जीबी रॅम देण्यात आली असून भारतीय बाजारात स्मार्टफोनची किंमत १८९९९ एवढी असल्याचे समजते.