Join us  

Coca Cola भारतात पहिल्यांदाच स्टार्टअपमध्ये करणार गुंतवणूक, स्विगी-झोमॅटोची झोप उडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:31 AM

कोल्डड्रिंक तयार करणारी कंपनी कोका-कोला ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.

कोल्डड्रिंक तयार करणारी कंपनी कोका-कोला (Coca-Cola) ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म थ्राईव्हमध्ये (Thrive) हिस्सा खरेदी करणार आहे. थ्राईव्ह हे फूड सर्च आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये ५,५०० हून अधिक रेस्तराँसह भागीदारी आहे. तसंच ही कंपनी स्विगी आणि झोमॅटोशी थेट स्पर्धा करते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील स्टार्टअपमध्ये कोका-कोलाची ही पहिली गुंतवणूक असेल. परंतु अद्याप त्याच्या डीलबद्दल कोणतीही अचूक आकडेवारी समोर आलेली नाही.

याशिवाय ही गुंतवणूक कोका-कोला कंपनीला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात आणखी पुढे जाण्यास मदत करेल. याद्वारे खाद्यपदार्थांसह कंपनी आपले प्रोडक्ट्स विकत घेण्यासाठी प्रमोटही करण्याची शक्यता आहे. यामुळे ऑर्डर कस्टमाईज करणं, पॅकेज डील आणि अन्नपदार्थांची विक्री यामदत होईल. २०२१ च्या अखेरिस डॉमिनोजची (Domino’s) ऑपरेटर ज्युबिलंट फूडवर्क्सनं (Jubilant Foodworks) थ्राईव्हमधील ३५ टक्के स्टेक सुमारे २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतला. त्यानंतर ग्राहकांना थेट डिलिव्हरी करण्यास तसेच ग्राहकांच्या डेटपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं होतं. 

कोका-कोलानं आजपर्यंत केवळ फूड चेन मॅकडोनाल्ड्ससोबत जागतिक पार्टनरशिप केली होती. याद्वारे त्या ठिकाणी केवळ कोका-कोलाचेच प्रोडक्ट्स विकण्यात येतात. कोका-कोला इंडियानं या प्रकरणी कोणतंही वक्तव्य केलं नाही. तसंच थ्राईव्ह नाऊचं संचालन करणाऱ्या हॅशटॅग लॉयल्टीचे को-फाऊंडर ध्रुव दिवान यांनीदेखील याप्रकरणी कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला.

मोठी संधीग्राहकांना रेस्तराँमधून खाद्यपदार्थ तसंच पेयं ऑर्डर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोका-कोलानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात कोक इज कुकिंग नावाचं जागतिक व्यासपीठ लाँच केलं होतं. दरम्यान, कोका-कोलाला फूड पेयरिंगसोबत विक्री वाढवण्यासाठी एक मोठी संधी दिसत असल्याची माहिती त्यावेळी त्यावेळी कोका-कोलाचे उपाध्यक्ष, मार्केटिंग हेड, भारत आणि दक्षिण पश्चिम आशिया, अर्णब रॉय यांनी दिली होती.

टॅग्स :झोमॅटोस्विगी