Cochin Shipyard Share :शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. अशाच कंपन्यांमध्ये मोठ-मोठे जहाज बनवणारी कंपनी कोचीन शिपयार्डचे (Cochin Shipyard) नाह सामील आहे. शुक्रवारी(दि.5) कंपनीच्या शेअरने रॉकेट वेग पकडला आणि 8 टक्क्यांच्या वाढीसह 2923.95 रुपयांवर पोहोचले. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे.
विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये तब्बल 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, गेल्या एका वर्षात या शेअरने 900% पेक्षा अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच, एका वर्षात गुंतवणूकदारांना 1 लाखाचे तब्बल 10 लाख रुपये मिळाले आहेत. कोचीन शिपयार्डचे शेअर्स 5 जुलै 2023 रोजी रु. 280.95 वर होते, जे 5 जुलै 2024 रोजी 2923.95 रुपयांवर आले.
एखाद्या व्यक्तीने एक वर्षापूर्वी कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर त्याला आज 10 लाख रुपये मिळतील. दरम्यान, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 320% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 5 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 681.10 रुपयांवर होते, जे आज 2923.95 रुपयांवर आले आहेत.
इतर जहाज कंपन्यांची परिस्थिती
Mazagon Dock Shipbuilders चे शेअर्स 5 जुलै 2024 रोजी Rs 5712.75 वर पोहोचले आहेत. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सनेही 5859.95 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. तर, गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 379% वाढ झाली आहे. 5 जुलै 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 567.10 रुपये होते, जे आज 2718.85 रुपयांवर पोहोचले आहेत.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)