फटो आहे.....साईज १० बाय २नागपूर : अरुण ऑटोमोबाईल्सतर्फे शुक्रवारी बजाज ऑटो कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष कमलनयन बजाज यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. अरुण ऑटोमोबाईल्स हे कंपनीचे विदर्भातील आघाडीचे डीलर आहेत.जमनालाल बजाज यांचे ज्येष्ठ चिरंजीव कमलनयन बजाज यांनी फार कमी वयात कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. इंग्लंड येथील कॅम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले. त्यांनी वडिलांना व्यवसाय व समाजकार्यात सहकार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी शेवटपर्यंत तत्त्वांशी तडजोड केली नाही. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग ते सामाजिक कार्यासाठी खर्च करीत होते. त्यांना महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला. ते देशभक्त होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. कोणताही व्यवसाय सुरू करताना ते सर्वात आधी देशाचा विचार करीत होते. कमलनयन बजाज यांच्या कार्यकाळात बजाज समूहाने देशातील पहिल्या १० सर्वश्रेष्ठ औद्योगिक घराण्यात स्थान मिळविले. आज बजाज समूहाचे बाजारात १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे भांडवल आहे. ८ हजार कोटी रुपये निव्वळ नफा आहे. बजाज ऑटो ही मोटरसायकल तयार करणारी जगातील तिसरी मोठी कंपनी आहे, अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली. याप्रसंगी अजयकुमार पाटणी, विजयकुमार पाटणी, श्रीकांत राठी, प्रेम राजुलकरंद आदी उपस्थित होते.
वाणिज्य - कमलनयन बजाज यांची जन्मशताब्दी साजरी
फोटो आहे.....साईज १० बाय २
By admin | Published: January 23, 2015 11:06 PM2015-01-23T23:06:13+5:302015-01-23T23:06:13+5:30