Lokmat Money > बिझनेस न्यूज > सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच वाहन विक्रीचा जोर

सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच वाहन विक्रीचा जोर

सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच वाहन विक्रीचा जोर वाढला असून, आॅगस्ट महिन्यात मारुती, ह्युंदाई, महिंद्रा, अशोक लेलँड आणि बजाज आॅटोसह सर्व प्रमुख वाहन कंपन्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:22 AM2017-09-02T04:22:10+5:302017-09-02T04:22:14+5:30

सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच वाहन विक्रीचा जोर वाढला असून, आॅगस्ट महिन्यात मारुती, ह्युंदाई, महिंद्रा, अशोक लेलँड आणि बजाज आॅटोसह सर्व प्रमुख वाहन कंपन्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली.

Before the commencement of the festive season, the sale of automobile sales | सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच वाहन विक्रीचा जोर

सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच वाहन विक्रीचा जोर

नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच वाहन विक्रीचा जोर वाढला असून, आॅगस्ट महिन्यात मारुती, ह्युंदाई, महिंद्रा, अशोक लेलँड आणि बजाज आॅटोसह सर्व प्रमुख वाहन कंपन्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली.
मारुती सुझुकी इंडियाच्या वाहन विक्रीत आॅगस्टमध्ये २३.८ टक्के वाढ झाली असून, मारुतीच्या १,६३,७०१ कार विकल्या गेल्या. या अवधीत भारतीय बाजारात या कंपनीने १,५२,००० कार विकल्या.
ह्युंदाई मोटार इंडियाच्या वाहन विक्रीतही या अवधीत ९ टक्के वाढ झाली. हिंदुजा समूहाच्या अशोक लेलँड कंपनीच्या वाहन विक्रीत एकूण २५.११ टक्के वाढ झाली. आॅगस्टमध्ये या कंपनीच्या १३,६३४ वाहने विकली गेली. मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही २८.८५ टक्के वाढ झाली.
टाटा मोटर्सने सांगितले की, आॅगस्टमध्ये एकूण विक्रीत १३.६४ टक्के वाढ झाली. या अवधीत टाटाची ४८,९८८ वाहने विकली गेली. व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीतही २४.७४ टक्के वाढली आहे.
दुचाकी वाहन क्षेत्रातील बजाज आॅटोने दिलेल्या माहितीनुसार बजाजच्या विक्रीत २.९८ टक्के वाढ झाली. देशांतर्गत २,००,६५९ वाहने विकली गेली.

Web Title: Before the commencement of the festive season, the sale of automobile sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.