Join us

वाणिज्य प˜ा ...१ ....

By admin | Published: January 22, 2015 12:07 AM


फोटो आहे... रॅपमध्ये ...
राष्ट्रस्तरीय औद्योगिक प्रदर्शन ३० पासून
नागपूर : विदर्भातील सूक्ष्म व लघु उद्योगाच्या विकासासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे राष्ट्रस्तरीय विक्रेता विकास कार्यक्रम व औद्योगिक प्रदर्शनाचे दोन दिवसीय आयोजन ३० व ३१ जानेवारीला उद्योग भवन, एसटी बसस्टॅन्डसमोर, चंद्रपूर येथे केले आहे. एमएसएमई मंत्रालयाच्या पब्लिक प्रोक्युरमेंट स्कीम-२०१२ च्या अंतर्गत केंद्र सरकारचे मंत्रालय, विभाग व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना उत्पादन आणि सेवा वार्षिक खरेदीच्या कमीतकमी २० टक्के सूक्ष्म व लघु उद्योगांकडून खरेदी करणे अनिवार्य आहे. विक्रेते विकास कार्यक्रम व औद्योगिक प्रदर्शनाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश सूक्ष्म व लघु उद्योगांच्या विकासासाठी उद्योजक व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांना एका व्यासपीठावर आणणे आणि सूक्ष्म व लघु उद्योगांचे उत्पादन व सेवा प्रदर्शित करून केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांच्या मागणींची पूर्तता करणे हा आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ३० जानेवारीला सकाळी १० वाजता केंद्रीय रसायन व खते मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी एमएसएमई विकास संस्थेचे संचालक पी.एम. पार्लेवार तर विशेष अतिथी म्हणून आ. नानाजी शामकुळे, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.आर. दीक्षित उपस्थित राहतील. समारोप चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाद्वारे निर्मित वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. वेकोलि, फेरो स्क्रॅप निगम, लि. भिलई, ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, कोकण रेल्वे, माझगाव डॉक आदी सार्वजनिक कंपन्याचे स्टॉल राहणार आहेत. खरेदीदार म्हणून नोंदणी कशी करावी, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात येईल. उद्योजक, युवक, व्यावसायिक सल्लागार, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.