वाणिज्य पा ..३ ...
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:04+5:302015-02-13T00:38:04+5:30
>फोटो आहे.. रॅपमध्ये ...एन्सारामध्ये शाळेचे भूमिपूजननागपूर : एन्सारा मेट्रो पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या सेंटर पॉईंट शाळेचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी शाळेच्या विविध शाखेतील विद्यार्थी पिपळा रोडवरील पार्कमध्ये उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी एन्सारा मेट्रो पार्क आणि सेंटर पॉईंट स्कूल असे लिहिलेले फुगे आकाशात सोडले. यावेळी गौरव आणि चिराग यांनी या कार्यासाठी निवडीबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले. निकिताच्या मते शाळेजवळ तलाव असल्यामुळे शिक्षणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. शिखाच्या मते शाळेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणे एक अविस्मरणीय क्षण आहे. यावेळी लक्झोरा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठारी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. अनया रिअल इस्टेट प्रा.लि. चे. अनोज असरानी यांनी ही शाळा अनेक एकरात उभी राहणार आहे. प्रत्येक वर्गाला थंड ठेवण्याची आणि पुरेसा प्रकाश, हवेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. जानेवारी २०१६ पर्यंत शाळेच्या व्यवस्थापनाला ताबा देण्यात येणार आहे. सेंटर पॉईंट ग्रुप ऑफ स्कूल्सचे संस्थापक संचालक अरुणा उपाध्याय यांनी ग्रुपच्या इतर शाळांप्रमाणे नवी शाळा आपली संस्कृती, आदर्श आणि सिद्धांतानुसार राहणार असल्याचे सांगितले. यावेळी अनया ग्रुपचे दीपक वसंदानी, तरुण हुदियानी, सेंटर पॉईंट ग्रुप ऑफ ग्रुप ऑफ स्कूल्सचे संस्थापक संचालक अरुण उपाध्याय, डॉ. जय रजवाडे, राधिका रजवाडे उपस्थित होते.