फटो आहे... रॅपमध्ये ...बालाजी सोसायटीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटनागपूर : श्री बालाजी सोसायटी, पुणेच्या मॅनेजमेंट इन्स्टट्यिूटचा उल्लेखनीय इतिहास आहे. सध्याच्या सत्रात उत्तम कॅम्पस प्लेसमेंटसाठी बालाजी इन्स्टट्यिूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, बालाजी इन्स्टट्यिूट ऑफ टेलिकॉम ॲण्ड मॅनेजमेंट, बालाजी इन्स्टट्यिूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, बालाजी इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंटच्या ॲण्ड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. श्री बालाजी सोसायटीचे संस्थापक डॉ. (कर्नल) ए बालासुब्रम्हणियम यांनी ८ फेब्रुवारीला नागपुरात भेट दिली. यावेळी त्यांनी बीआयएमएम, बीआयटीएम, बीआयआयबी आणि बीआयएमएचआरडी या कॉलेजमध्ये संयुक्तिक प्रवेश प्रक्रिया घेतली. ते २८ वर्षे आर्मीमध्ये होते. तीन विषयात ते पदव्युत्तर आहेत. कॉर्पोरेट सिटिझन मासिकाचे ते एडिटर-इन-चीफ आहेत. याशिवाय सर्व मॅनेजमेंट इन्स्टट्यिूटचे ते व्यवस्थापकीय संचालक आणि प्राचार्य आहेत. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये देशभरातील जवळपास ३०० कंपन्यांचा सहभाग होता. कॉलेजचे कॅम्पस औद्योगिक परिसरात २० एकरपेक्षा जास्त जागेत आहेत. अनेक कंपन्या या सर्व इन्स्टट्यिूटला भेटी देतात. सर्व चारही इन्स्टट्यिूटचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. इन्स्टट्यिूटतर्फे प्लेसमेंट डाटा वेळोवेळी वेबसाईटवर अपडेट केला जातो आणि डाटा हे दाखविते की, ७४५ पैकी ५१० विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. वेदांता या कंपनीने वार्षिक ११.२ लाखाचे पॅकेज दिले, तर ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक ५ लाख आणि त्यापेक्षा जास्त पॅकेज मिळाले. उर्वरित विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी श्री बालाजी सोसायटीचे कॉर्पोरेट रिलेशन संचालक आश्वस्त आहेत. स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडस इंड बँक, कोटक बँक, पीपल्स स्ट्राँग कन्सल्टिंग, केन्सई नेरोलॅक, महिन्द्र ॲण्ड महिन्द्र, ह्यंुडई, इन्फोसिस, ईक्लर्क सर्व्हिसेस, लाईमस्ट्रॉम सर्व्हिसेस, इंडस टॉवर्स, झी एन्टरटेनमेंट, टीसीएस, टीसीएस बीपीएस, डेल इंडिया आणि अन्य कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन व सप्लाय चेन, एचआर, इंटरनॅशनल बिझनेस, टेलिकॉम ॲण्ड सिस्टिम या क्षेत्रात कंपन्यांची मागणी होती.
वाणिज्य पा ...४ ...
फोटो आहे... रॅपमध्ये ...
By admin | Published: February 10, 2015 12:55 AM2015-02-10T00:55:45+5:302015-02-10T00:55:45+5:30