Join us

वाणिज्य - हिलफोर्ट स्कूलचे साहस शिबिर

By admin | Published: February 21, 2015 12:50 AM

फोटो आहे...........

फोटो आहे...........

नागपूर : हिलफोर्ट पब्लिक स्कूलतर्फे इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शहरापासून ४२ किलोमीटर लांब परिसरात साहस शिबिर आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वावलंबी, कणखर व निर्भय करणे हा शिबिराचा उद्देश होता.
शिबिरात जीवन कौशल्य व स्वतंत्रपणे जगण्याचा अनुभव देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ट्रेकिंग, राफ्ट बिल्डिंग, रॉक क्लायम्बिंग, नेट क्लायम्बिंग, रोप कोर्स, स्टार गेझिंग, स्विमिंग, नेचर ट्रेल व टिम गेम इत्यादी उपक्रमांत उत्साहाने सहभाग घेतला. समूहाने कार्य करणे, एकमेकांना सहकार्य करणे, एकमेकांची काळजी घेणे, भावना व्यक्त करणे इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना शिकायला मिळाल्या. निसर्गरम्यता व निसर्गाशी एकरूप होताना येणार अडचणींचा विद्यार्थ्यांना अनुभव आला, अशी माहिती प्राचार्या प्रीती वैरागडे यांनी दिली.