Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १५८ रुपयांची कपात, पाहा काय आहेत नवे दर

LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १५८ रुपयांची कपात, पाहा काय आहेत नवे दर

घरगुती एलपीजी सिलिंडरपाठोपाठ आता सरकारने कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरातही कपात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:28 AM2023-09-01T10:28:00+5:302023-09-01T10:29:54+5:30

घरगुती एलपीजी सिलिंडरपाठोपाठ आता सरकारने कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरातही कपात केली आहे.

Commercial 19 kg LPG cylinder price reduced by Rs 158 see what are the new rates mumbai delhi kolkata | LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १५८ रुपयांची कपात, पाहा काय आहेत नवे दर

LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १५८ रुपयांची कपात, पाहा काय आहेत नवे दर

घरगुती एलपीजी सिलिंडरपाठोपाठ आता सरकारने कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinder) दरातही कपात केली आहे. १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १५८ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यानंतर दिल्लीत या सिलिंडरची किंमत १५२२ रुपये झाली आहे. इंधन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

कोलकात्यात १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आता १६३६ रुपये, मुंबईत १४८२ रुपये आणि चेन्नईमध्ये १६९५ रुपये झाली आहे. यापूर्वी १ ऑगस्ट रोजीही कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी जुलैमध्ये त्याची किंमत सात रुपयांनी वाढली होती. यापूर्वी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारनं एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ११०३ रुपयांवरून ९०३ रुपयांवर आली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता सिलिंडरची किंमत ७०३ रुपये आहे.

इम्पोर्ट ड्युटी, सेस कमी
सरकारनं घरगुती एलपीजीवरील इम्पोर्ट ड्युटी आणि अॅग्री तसंच इन्फ्रा सेस १५ टक्क्यांनी कमी करून शून्यावर आणलाय. खासगी कंपन्यांच्या एलपीजीच्या आयातीवर १५ टक्के आयात शुल्क आणि १५ इम्पोर्ट ड्युटी आणि अॅग्री तसंच इन्फ्रा सेस लावण्यात आलं होतं. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं एका अधिसूचनेत म्हटलंय की नवीन दर आजपासून म्हणजेच १ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. यापूर्वी १ जुलै रोजी सरकारनं घरगुती एलपीजी सिलिंडरवरील बेसिक कस्टम ड्युटी पाच टक्क्यांवरून १५ टक्के केली होती. यासोबतच एलपीजी सिलिंडरवर १५ टक्के अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस लावण्यात आला. सरकारी इंधन कंपन्यांना मात्र यात वेगळं ठेवण्यात आलं होतं.

Web Title: Commercial 19 kg LPG cylinder price reduced by Rs 158 see what are the new rates mumbai delhi kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.