वाणिज्य पा ...१ ...
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM
इंडस्ट्रीज एक्स्पो आजपासून नागपूर : इन्दोर इन्फो लाईन प्रा.लि.च्यावतीने तीन दिवसीय चौथ्या इंडस्ट्रीयल एक्स्पोचे (इंडेक्स्पो) आयोजन शुक्रवार, १३ फेब्रुवारीपासून रेशीमबाग मैदानावर करण्यात येणार आहे. उद्घाटन सकाळी १० वाजता होईल. सकाळी ११ ते २ पर्यंत बिझनेस, २ ते ४ पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि ४ ते ७ ही वेळ एक्स्पोला भेट देणाऱ्यांसाठी राखीव आहे. देशातील १०० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या आपली उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करतील. सिम्फोनी, आर.आर. इस्पात, पायलट मशीन, बॉश, टीआयडीसी, कार्बोरॅण्डम युनिव्हर्सल, इन साईज, गाला सिंक, बालाजी इंजिनीअरिंग कोलकाता, सिम्फोनी कुलर्स, ब्रीज एअर कुलर्स, एस.ए. फील्ड, स्ट्रक्चराईट, एलकॉम इंटरनॅशनल आदी कंपन्यांचा समावेश आहे. रेशीमबाग मैदानावर ५० हजार चौरस फूट परिसरात डोम आहेत. गेल्या तीन एक्स्पोमध्ये अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि संपूर्ण विदर्भातील हजारो लोकांनी भेटी दिल्या तर कंपन्यांनी २०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. ऑटोमेशन, मशीन टूल्स, बेअरिंग, स्विचगिअर, गिअर्स व पंप, वेल्डिंग उपकरणे, फार्मा मशीनरीज, मटेरियल्स हॅडलिंग इक्विपमेंट, हॅण्ड टूल्स, पॉवर टूल्स, कटिंग टूल्स, कन्स्ट्रक्शन मशीन व मेन्टेनन्स उपकरणांची माहिती एक्स्पोमध्ये पहिल्यांदा मिळणार आहे. उपकरणांच्या बुकिंगवर सवलत मिळणार आहे. हा एक्स्पो नागपूर शहरातील औद्योगिक गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन (हिंगणा) आणि बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन हे सहप्रायोजक आणि मार्गदर्शक आहेत. इन्दोर इन्फोलाईनतर्फे नागपूरसह पुणे, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, रायपूर, इंदूरसह आणि देशातील १० मोठ्या शहरांमध्ये इंडस्ट्रीयल एक्स्पोचे आयोजन केले आहे.