Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price Hike: हॉटेलिंगसाठी मोजावी लागेल अधिक रक्कम; व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महाग

LPG Price Hike: हॉटेलिंगसाठी मोजावी लागेल अधिक रक्कम; व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महाग

LPG cylinders: पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला इंधन दरांबरोबरच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतींचाही आढावा घेतात. त्यात गरजेनुसार वाढ केली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:15 AM2021-11-02T07:15:25+5:302021-11-02T07:15:54+5:30

LPG cylinders: पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला इंधन दरांबरोबरच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतींचाही आढावा घेतात. त्यात गरजेनुसार वाढ केली जाते.

Commercial LPG cylinders cost Rs 266 more from 1 November | LPG Price Hike: हॉटेलिंगसाठी मोजावी लागेल अधिक रक्कम; व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महाग

LPG Price Hike: हॉटेलिंगसाठी मोजावी लागेल अधिक रक्कम; व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महाग

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सिलिंडरच्या दरात थेट २६६ रुपयांची घसघशीत वाढ केल्याने ऐन दिवाळीत हॉटेलिंग करणे महाग 
होणार आहे. नव्या दरवाढीनंतर मुंबईत १,६८३ रुपयांना मिळणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९४९ रुपये तर  दिल्लीत २००० रुपये झाली आहे. 

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला इंधन दरांबरोबरच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतींचाही आढावा घेतात. त्यात गरजेनुसार वाढ केली जाते. घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर वाढविण्यात आलेले नाहीत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने सामान्यांवर त्याचा थेट परिणाम होणार नसला तरी हॉटेल व्यवसाय आणि तयार खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता 
आहे.

सिलिंडर कुठे किती रुपये?
मुंबई : १९५० रुपये 
नवी दिल्ली : २००० रुपये 
कोलकाता : २०७३ रुपये 
चेन्नई : २१३३ रुपये

Web Title: Commercial LPG cylinders cost Rs 266 more from 1 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.