मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संप सुरू असतानाच, आता राज्यातील अन्य व्यावसायिक वाहतूकदारही शुक्रवार, २० जुलैपासून बेमुदत संपावर जात आहेत. डिझेल दरवाढ मागे घ्या अथवा भाडे दरवाढीची परवानगी द्या, अशी त्यांची मागणी आहे. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या हाकेवर महाराष्टÑ राज्य ट्रक, टेम्पो, टँकर वाहतूकदार महासंघाने हा संप पुकारला आहे.सरकारी तेल कंपन्यांनी मेमध्ये १६ दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर सरासरी साडे तीन रुपये प्रति लीटरने वाढविले. त्यानंतर, ३५ दिवस दरात घसरण झाली, पण ती अत्यल्प असताना मागील दहा दिवसांत पुन्हा दरवाढ झाली आहे. महासंघाचे अध्यक्ष दयानंद नाटकर यांनी की, वाहतूकदारांनी डिझेल ६४ रुपये असताना दर निश्चित केले होते. आता डिझेल महागताच भाडेही वाढवल्यास केल्यास केंद्र आमच्यावर व्यावसायिक स्पर्धा आयोगाद्वारे मक्तेदारी कायद्यांतर्गत कारवाई करते व भरमसाठ दंड ठोठावते. यामुळे डिझेलचे दर वाढले असतानाही वाहतूकदारांना प्रति किमी दोन ते चार रुपयांचे नुकसान सहन करीत व्यवसाय करावा लागत आहेत. या सर्वांचा निषेध बेमुदत संपाद्वारे केला जाणार आहे. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे देशभरातील ३५०० तालुक्यांत ९३ लाख सदस्य आहेत.>संपात कोण?स्कूल बसेस, खासगी बस वाहतूकदार, माल वाहतुकीचे टेम्पो, सर्व प्रकारच्या मालवाहतुकीचे ट्रक, छोटे पाच चाकी टेम्पो, पाणी, दूध व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणारे टँकर आदी.
व्यावसायिक वाहतूकदार उद्यापासून जाणार संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 1:00 AM