Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्यासाठी समिती

शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्यासाठी समिती

२0२२ पर्यंत कृषी क्षेत्राची मिळकत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारने एक व्यापक योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे.

By admin | Published: April 23, 2016 03:12 AM2016-04-23T03:12:53+5:302016-04-23T03:12:53+5:30

२0२२ पर्यंत कृषी क्षेत्राची मिळकत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारने एक व्यापक योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे.

Committee to double the income of farmers | शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्यासाठी समिती

शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्यासाठी समिती

नवी दिल्ली : २0२२ पर्यंत कृषी क्षेत्राची मिळकत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारने एक व्यापक योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधीचा वायदा केला होता.
कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याचे कृषी धोरण उत्पादन केंद्रित आहे. ते मिळकत केंद्रित करण्यासाठी योग्य धोरणे ही समिती तयार करील. समितीत आठ सदस्य आहेत. अधिक गुंतवणुकीची गरज असलेली क्षेत्रे ही समिती शोधून काढील. याशिवाय फळबागा, पशुपालन, मत्स्यपालन यासारख्या जोडधंद्यांचे अधिक विविधीकरण करण्यासाठी उपाय सुचवील. जोखीम कमी करण्याचे उपायही सांगेल.
आंतर-मंत्रालयीन समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.

Web Title: Committee to double the income of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.