मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ‘नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड- एनएसईएल’मधील साडे पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळ्यांच्या प्रकरणी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशातून, परतावा मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे १३ हजार गुंतवणूकदारांना गुंतलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. परतावा मिळावा याकरिता उच्च न्यायालयाच्या समितीसह केंद्रीय वित्तमंत्रालयाच्या आदेशान्वये ‘सेबी’ने एका समितीचे गठन केले आहे. ही समिती गुंतवणूकदार व त्यांच्यासाठी व्यवहार करणाऱ्या दलालांच्या व्यवहाराचे लेखापरीक्षण करेल. यासंदर्भातील तपासादरम्यान, व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदार व सदस्यांच्या वित्तीय तपशिलात विसंगती आढळून आल्यामुळे या समितीद्वारे या सर्व तपशिलांची छाननी होणार आहे. काही प्रकरणांमध्ये तर ‘पॅन’ क्रमांकाच्या नोंदीही संशयास्पद असल्याचे आढळले.एनएसईएलमध्ये व्यवहार करणाऱ्या आठ दलाल पेढ्या आणि सात गुंतवणूकदारांसंबंधी लेखापरीक्षण होण्याची शिफारस समितीने केली आहे. (प्रतिनिधी)
गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यास समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 4:55 AM