लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजीपाला व खाद्य तेलाच्या किमती घसरल्यामुळे शाकाहारी जेवणाचे दर घटले आहेत. शाकाहारी थाळी सुमारे ९ टक्के स्वस्त झाली आहे. मात्र, धान्य महाग झाल्यामुळे किमतीत जास्त घट झालेली नाही. ‘क्रिसिल’ने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे.
धान्य, डाळी इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे शाकाहारी थाळीचे दर वाढले हाेते. गेल्या काही महिन्यांपासून त्यात सातत्याने घट हाेत आहे. अद्रक आणि लसणाचे दर गेल्या दाेन महिन्यांपासून २५० रुपये किलाेपेक्षा जास्त आहेत. काही धान्यांचे दर घटले असले तरी त्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्या. मांसाहारी थाळीचे दर मात्र वाढले आहेत. २५% वाटा शाकाहारी थाळीच्या दरात भाजीपाला आणि खाद्यतेलाचा असताे.
शाकाहारी थाळीचे दर
ऑक्टाेबर २०२२ ₹२९नाेव्हेंबर २०२२ ₹२७.७डिसेंबर २०२२ ₹२६.४जानेवारी २०२३ ₹२६.४फेब्रुवारी २०२३ ₹२५.५मार्च २०२३ ₹२५.१एप्रिल २०२३ ₹२५