गेल्या काही दिवसापासून देशात एलपीजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत,आता महागाईने त्रस्त असलेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार येत्या काही दिवसांत एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करू शकते. सरकार एलपीजी सिलिंडरवर सबसिडी देण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे अनुदान १०० ते २०० रुपये प्रति सिलेंडर असू शकते. मोदी सरकार लवकरच ही सूट जाहीर करू शकते, असं बोललं जात आहे.
देशात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाला आगामी निवडणुकांशीही जोडले जात आहे. यावर्षी देशातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. दरम्यान, महागाई हा मोठा निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो. त्याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींबाबत विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.
सध्या, देशांतर्गत घरगुती एलपीजी सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत सुमारे ११०० रुपये आहे. त्यांच्या किमतीत बराच काळ चढ-उतार झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील दीर्घकाळापासून स्थिर आहेत.