कर्नाटक: कोरोना संसर्गामुळे बहुतेक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना वर्क प्रॉम होम देण्यात आलं आहे. कोरोना आल्यापासून देशात वर्क फ्रॉम होम कल्चरमध्ये चांगलीच वाढ झालीय. आता अजून किती दिवस वर्क फ्रॉम मिळणार हे कुणाला ठाऊक नाही. पण, कर्नाटकात डिसेंबर 2022 पर्यंत वर्क फ्रॉम होम दिलं जाऊ शकतं. असा सल्लाच सरकारनं तेथील कंपन्यांना दिला आहे.
कर्नाटकात सध्या आउटर रिंग रोडवर मेट्रोचं काम सुरू आहे. या कामामुळे रस्तानं प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि या अडचणी ट्रॅफिक वाढल्याने अजून वाढू शकतात. या परिस्थितीमुळे इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, टीव्ही आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून तिथल्या सर्व कंपन्यांना पत्र पाठवण्यात आलं असून, या पत्रात कंपन्यांना डिसेंबर 2022 पर्यंत वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे.
कंपन्या निर्णय घेऊ शकते
अॅडमिशन चीफ सेक्रेटरी ईवी रमन रेड्डी यांच्या मते, हा फक्त एक सल्ला आहे, त्यावर विचार करणं आणि त्याची अंमलबजावणी करायची का नाही, हे कंपनीवर अवलंबून आहे. कंपन्यांना याची अंमलबजावणी करण्याची गरज नाही. आवश्यक असल्यास, कंपन्या कार्यालयातून काम सुरू करू शकतात. कर्मचाऱ्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागू नये म्हणून हे पत्र विभागाने जारी केलं आहे.
12 हजार कर्मचारी या क्षेत्रात काम करतात
आऊटर रिंग रोडवर सुमारे 12 हजार कर्मचारी काम करतात. यापैकी केवळ 5 टक्के कर्मचारी आता परत येत आहेत. सिस्कोनं वर्क फ्रॉम होम पॉलिसी कायमस्वरूपी अंमलात आणली आहे आणि एसएपी, वॉलमार्ट, इंटेल सारख्या कंपन्यांनी या सल्ल्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.