नवी दिल्ली : दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी नेटवर्कसाठी कमी गुंतवणूक केल्याबद्दल सरकारने मंगळवारी त्यांना झटकले. नेटवर्क चांगल्या रीतीने उपलब्ध करून देणे ही या कंपन्यांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना त्यापासून दूर पळता येणार नाही, असे दूरसंचार सचिव राकेश गर्ग म्हणाले. ते मंगळवारी येथे वार्ताहरांशी बोलत होते.
नेटवर्क व्यवस्थित ठेवण्यासाठी कंपन्यांनी पुरेशी गुंतवणूक न केल्यामुळेच कॉल ड्रॉपचा प्रश्न उपस्थित झाला आहे. किरणोत्सर्ग (रेडिएशन) होण्याच्या शक्यतेमुळे मनोऱ्यांची जागा बदलणे व मनोऱ्यांच्या जागेच्या मंजुरीच्या प्रश्नामुळे कॉल ड्रॉप होत असल्याचा कंपन्यांचा दावा गर्ग यांनी फेटाळला.
गर्ग म्हणाले,‘‘ही कारणे आधीही होतीच; परंतु कॉल ड्रॉपचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.’’
स्पेक्ट्रमचा खर्च बाजूला काढला तर कंपन्यांनी आपल्या उत्पन्नाचा केवळ १३ टक्के भागच पायाभूत सुविधांमध्ये गुंतविला. कंपन्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली नाही, असेही ते म्हणाले.
कॉल ड्रॉप प्रश्नावर कंपन्यांना झाडले
दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी नेटवर्कसाठी कमी गुंतवणूक केल्याबद्दल सरकारने मंगळवारी त्यांना झटकले. नेटवर्क चांगल्या रीतीने उपलब्ध करून देणे
By admin | Published: August 18, 2015 10:05 PM2015-08-18T22:05:48+5:302015-08-18T22:05:48+5:30