Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपन्या नफ्यात, तरी इंधन भडकलेलेच; दीड वर्षामध्ये प्रथमच पेट्राेल-डिझेलच्या विक्रीतून कंपन्यांना फायदा

कंपन्या नफ्यात, तरी इंधन भडकलेलेच; दीड वर्षामध्ये प्रथमच पेट्राेल-डिझेलच्या विक्रीतून कंपन्यांना फायदा

नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेल विकणाऱ्या तेल कंपन्यांना गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच दाेन्ही इंधनातून नफा हाेत आहे. आधी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:13 AM2023-04-10T06:13:23+5:302023-04-10T06:13:51+5:30

नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेल विकणाऱ्या तेल कंपन्यांना गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच दाेन्ही इंधनातून नफा हाेत आहे. आधी ...

Companies in profit but fuel burning Companies benefit from petrol diesel sales for the first time in a year and a half | कंपन्या नफ्यात, तरी इंधन भडकलेलेच; दीड वर्षामध्ये प्रथमच पेट्राेल-डिझेलच्या विक्रीतून कंपन्यांना फायदा

कंपन्या नफ्यात, तरी इंधन भडकलेलेच; दीड वर्षामध्ये प्रथमच पेट्राेल-डिझेलच्या विक्रीतून कंपन्यांना फायदा

नवी दिल्ली :

पेट्राेल आणि डिझेल विकणाऱ्या तेल कंपन्यांना गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच दाेन्ही इंधनातून नफा हाेत आहे. आधी पेट्राेलविक्रीतून नफा हाेत हाेता. आता डिझेलवर ५० पैसे प्रतिलीटर एवढा नफा हाेत आहे, तर पेट्राेलवर या कंपन्यांना ६.८० रुपये प्रतिलीटर नफा हाेत आहे. यामुळे ग्राहकांना आकाशाला भिडलेल्या इंधनाच्या किमतींपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.

भारत सध्या रशियाकडून माेठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहे. मार्च महिन्यात भारताने दरराेज सरासरी १६.४ लाख बॅरल एवढे कच्चे तेल आयात केले आहे. इराकच्या तुलनेत रशियाकडील आयात दुप्पट झाली आहे. 

इराककडून भारताने दरराेज ८.१ लाख बॅरल कच्चे तेल आयात केले. सलग सहा महिन्यांपासून भारत रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी करत आहे. ओपेक देशांच्या तुलनेत रशिया भारताला बरेच स्वस्तात कच्चे तेल विकत आहे. त्यामुळे तेल कंपन्यांचा फायदा हाेत आहे. 

दिलासा कधी?
- पेट्राेलवर काही महिन्यांपासून ६ ते ६.५० रुपये प्रतिलीटर नफा कंपन्याना हाेत आहे. डिझेल विक्रीतून ताेटा हाेत असल्यामुळे दरकपात केली जात नव्हती, असे पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. 
- आता डिझेलविक्रीतूनही नफा हाेत आहे. त्यामुळे आतातरी दरकपात करून जनतेला दिलासा देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

साैदीमुळे बिघडले गणित
गेल्या महिन्यात कच्च्या तेलाचे दर ७० डाॅलर्स प्रतिबॅरलच्या आसपास हाेते. मात्र, साैदी अरब आणि ओपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर सुमारे ५ टक्क्यांनी वाढले. 

असा चालताे कच्चे तेल आयात-निर्यातीचा बाजार
भारत रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत आहे. तेच रिफाईन करून युराेपियन देशांना तेल कंपन्या पेट्राेल, डिझेल बाजार भावाने विकत आहेत. 
२२ पट वाढली रशियाकडून कच्च्या तेलाची आयात.
३०  पट वाढली युराेपमध्ये पेट्राेल-डिझेलची निर्यात
२  लाख बॅरल डिझेलची युराेपमध्ये दरराेज निर्यात.
७५  हजार बॅरल विमान इंधनाची युराेपमध्ये निर्यात झाली २०२२-२३ मध्ये

 

Web Title: Companies in profit but fuel burning Companies benefit from petrol diesel sales for the first time in a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.