Join us  

खाऊ-पिऊ घालताे, पण ऑफिसला येणे सुरू करा; कंपन्यांचा ‘ऑफिस पिकॉकिंग’चा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 7:35 AM

बंगळुरू, मुंबई, दिल्ली- राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि हैदराबादमध्ये ‘ऑफिस पिकॉकिंग’चे प्रमाण सर्वाधिक आहे.

मुंबई - कोरोना साथीनंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयातून कामाला प्रवृत्त करण्यासाठी कंपन्या ‘ऑफिस पिकॉकिंग’चा वापर करीत आहेत. कार्यालयांची जागा अधिक आकर्षक, सुविधांनी परिपूर्ण आणि आरामदायक बनविण्यास ‘ऑफिस पिकॉकिंग’ असे म्हटले जाते.

टीमलीज सर्व्हिसेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक नारायण म्हणाले की, साथीच्या काळात घरून काम करण्याची सवय कर्मचाऱ्यांना लागली. त्यांना पुन्हा कार्यालयांत आणणे हे मोठे आहे. त्यामुळे आकर्षक फर्निचर, सुविधा आणि खाण्या-पिण्याची व्यवस्थाही कंपन्यांकडून केली जात आहे.

‘सीआयईएल’चे संचालक तथा सीईओ आदित्य नारायण मिश्रा यांनी सांगितले की, कार्यालयांची सजावट व डिझाइनमधील गुंतवणूक २५ ते ३० टक्के वाढली आहे. बंगळुरू, मुंबई, दिल्ली- राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि हैदराबादमध्ये ‘ऑफिस पिकॉकिंग’चे प्रमाण सर्वाधिक आहे. स्टार्टअप संस्थाही या तंत्राचा वापर करीत आहेत.