Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टॉक घटविण्यासाठी कंपन्यांनी पुरवठा घटविला; प्रवासी वाहनांच्या विक्रीत २ टक्क्यांची घट

स्टॉक घटविण्यासाठी कंपन्यांनी पुरवठा घटविला; प्रवासी वाहनांच्या विक्रीत २ टक्क्यांची घट

३,५२,९२१ वाहने ऑगस्ट २०२४ मध्ये डिलरांना पाठविली. गेल्या वर्षी हा आकडा ३,५९,२२८ इतका होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 07:21 AM2024-09-14T07:21:42+5:302024-09-14T07:21:56+5:30

३,५२,९२१ वाहने ऑगस्ट २०२४ मध्ये डिलरांना पाठविली. गेल्या वर्षी हा आकडा ३,५९,२२८ इतका होता.

Companies reduced supplies to reduce stocks; 2 percent decline in passenger vehicle sales | स्टॉक घटविण्यासाठी कंपन्यांनी पुरवठा घटविला; प्रवासी वाहनांच्या विक्रीत २ टक्क्यांची घट

स्टॉक घटविण्यासाठी कंपन्यांनी पुरवठा घटविला; प्रवासी वाहनांच्या विक्रीत २ टक्क्यांची घट

नवी दिल्ली : ऑगस्ट २०२४ मध्ये प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक आधारे सुमारे २ टक्के घटली. मागणी घसरल्याने डिलरांकडील वाहन साठे कमी करण्यासाठी कंपन्यांनी पुरवठा घटवला, त्यामुळे घाऊक विक्री कमी झाली.

‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. कंपन्यांकडून डिलरांना होणाऱ्या वाहन पुरवठ्यास ‘घाऊक विक्री’ असे म्हणतात. ती ऑगस्टमध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत १.८ टक्के घटली आहे. ३,५२,९२१ वाहने ऑगस्ट २०२४ मध्ये डिलरांना पाठविली. गेल्या वर्षी हा आकडा ३,५९,२२८ इतका होता.

बाइक विक्रीत घट

वाहनांची घाऊक विक्री ९ टक्के घटून १७,११,६६२ वाहनांवर आली. स्कूटरची घाऊक विक्री मात्र १० टक्के वाढून ६,०६,२५० इतकी झाली. 

 

Web Title: Companies reduced supplies to reduce stocks; 2 percent decline in passenger vehicle sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.