बंगळुरू : आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांचा प्रति कर्मचारी महसूल (आरपीई) वरचेवर कमी होत आहे. जुन्या सेवा कमजोर झाल्या असतानाच नव्या डिजिटल व्यवसायातून महसूल मिळविण्यासाठी कंपन्यांना संघर्ष करावा लागत आहे, त्याचा हा परिणाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, प्रति कर्मचारी महसूलातून कंपनीची कार्यकुशलता लक्षात येते. जुने व्यवसाय कमजोर होत असताना आपण डिजिटल उद्योगातून चांगला महसूल कमावित असल्याचा दावा कंपन्या करीत आहेत. तथापि, प्रति कर्मचारी महसूलाचे आकडे वेगळीच माहिती देत आहेत. शिवाय डिजिटल या शब्दाची नेमकी व्याख्या अद्याप आयटी क्षेत्रात रूढ झालेली नाही. समाज माध्यमे, मोबाईल, विश्लेषणात्मक क्लाऊड, इंटरनेट आदि असंख्य बाबी डिजिटलमध्येच गृहीत धरल्या जात आहेत, असे अमेरिकास्थित एचएफएस रिसर्च संस्थेचे सीईओ फिल फेर्श्ट यांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, प्रति कर्मचारी महसूल घटल्यामुळे कंपन्या नोकरकपातीकडे वळल्या आहेत. डिजिटल टेक्नॉलॉजीचा व्यवसाय हाती घेतल्यापासून टीसीएस आणि विप्रो या दोन्ही कंपन्यांचा प्रति कर्मचारी महसूल घटला आहे.
एका संस्थेने केलेल्या विश्लेषणानुसार जून २0१५ च्या तिमाही अखेरीस टीसीएसने पहिल्यांदा डिजिटल महसुलाची नोंद केली. तेव्हापासून कंपनीच्या डिजिटल व्यवसायात ७१ टक्के वाढ झाली आहे. तथापि, प्रति कर्मचारी महसूल मात्र ७.१ टक्क्याने घटला आहे.
विप्रोचीही हीच स्थिती आहे. डिजिटल महसुलात २८ टक्के वाढ झाल्याचा दावा विप्रोने केला असला तरी गेल्या वर्षी कंपनीच्या प्रति कर्मचारी महसुलात ३.२ टक्के घटाली आहे.
इन्फोसिसने डिजिटल व्यवसायातून किती महसूल
मिळाला हे जाहीर करण्याचेच
टाळले आहे. आॅक्टोबर-डिसेंबर २0१४
पासून इन्फोसिचा प्रति
कर्मचारी महसूल २ टक्क्यांनी
घटला आहे. विशेष म्हणजे
आॅक्टोबर-डिसेंबर २0१४ या तिमाहीतच विशाल सिक्का यांच्याकडे पहिल्यांचा सीईओची सूत्रे हाती आली होती. (वृत्तसंस्था)
डिजिटल व्यवसायातून कमाईसाठी कंपन्यांचा संघर्ष
आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांचा प्रति कर्मचारी महसूल (आरपीई) वरचेवर कमी होत आहे.
By admin | Published: May 23, 2017 02:55 AM2017-05-23T02:55:17+5:302017-05-23T02:55:17+5:30