Lokmat Money > बिझनेस न्यूज > बोगस पत्ता असलेल्या कंपनीने नोटाबंदीत भरले ३,१७८ कोटी

बोगस पत्ता असलेल्या कंपनीने नोटाबंदीत भरले ३,१७८ कोटी

नोटाबंदीच्या काळात तब्बल ३,१७८ कोटी रुपये बँकेत भरून पुन्हा काढून घेणाऱ्या हैदराबादेतील कंपनीचा पत्ताच बोगस असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:56 PM2018-07-31T23:56:01+5:302018-07-31T23:56:13+5:30

नोटाबंदीच्या काळात तब्बल ३,१७८ कोटी रुपये बँकेत भरून पुन्हा काढून घेणाऱ्या हैदराबादेतील कंपनीचा पत्ताच बोगस असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

 The company with a bogus address of Rs | बोगस पत्ता असलेल्या कंपनीने नोटाबंदीत भरले ३,१७८ कोटी

बोगस पत्ता असलेल्या कंपनीने नोटाबंदीत भरले ३,१७८ कोटी

हैदराबाद : नोटाबंदीच्या काळात तब्बल ३,१७८ कोटी रुपये बँकेत भरून पुन्हा काढून घेणाऱ्या हैदराबादेतील कंपनीचा पत्ताच बोगस असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या कंपनीची गंभीर घोटाळा चौकशी कार्यालयाच्या (एसएफआयओ) वतीने चौकशी केली जात आहे.
‘ड्रीमलाइन मॅनपॉवर सोल्युशन्स प्रा.लि.’ असे या कंपनीचे मूळ नाव आहे. या कंपनीने नंतर आपले नाव बदलून नित्यांक इन्फ्रापॉवर अ‍ॅण्ड मल्टिव्हेंचर प्रा.लि. असे केले. द्वार क्र. ८-४-५४८/१, गोकूळ थिएटरजवळ, एरागड्डा, हैदराबाद असा पत्ता कंपनीने नोंदविलेला आहे. या पत्त्यावरील एन. सिद्दप्पा निलयम इमारत पूर्णत: निवासी स्वरूपाची आहे. तेथील रहिवासी सांगतात की, येथे
कोणतीही कंपनी कधीच अस्तित्वात नव्हती.
नोटाबंदीनंतर १५ नोव्हेंबर २0१७ रोजी कंपनी व्यवहार मंत्रालयाने १८ कंपन्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात ड्रीमलाइनचा समावेश होता. कंपनी व्यवहार मंत्रालयाने चौकशीचा आदेश जारी करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ नोव्हेंबर २0१७ रोजी कंपनीने आपले नाव बदलले. नोटाबंदीच्या काळात १00 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भरणा करणाºया कंपन्यांची प्रत्येकी दोन अधिकाºयांमार्फत चौकशी केली जात आहे. त्यातील एक जण गंभीर घोटाळा चौकशी कार्यालयाचा, तर दुसरा कंपनी नोंदणी कार्यालयाचा अधिकारी आहे. (वृत्तसंस्था)

कंपनीवर बँकेचे १७00 कोटींचे कर्ज
ड्रीमलाइनची स्थापना २0१२ रोजी करण्यात आली. जून २0१७ पासून कंपनीने कर्ज घ्यायला सुरुवात केली. सध्या कंपनीवर येस बँकेचे १,७00 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सूरज कुमार यादव आणि हितेश मनोहर इंगळे अशा दोन संचालकांनी कंपनीचे २0१७-१८चे रिटर्न दाखल केले आहे.

Web Title:  The company with a bogus address of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.