नवी दिल्ली : अवघ्या २५0 रुपयांत स्मार्ट फोन देण्याचा दावा करणारी रिंगिंग बेल्स ही कंपनी ८ जुलैपासून मोबाईलची डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, ही कंपनी तोट्यात असून, सरकारकडून ५0 हजार कोटींची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी कंपनीच्या सीईओने केली आहे.
रिंगिंग बेल्सच्या बहुचर्चित स्मार्ट फोनचे नाव ‘फ्रीडम २५१’ असे ठेवण्यात आले आहे. २९0 रुपयांत तो घरपोच देण्यात येणार आहे. त्यातील ४0 रुपये वाहतूक खर्च आहे. फोनची निर्मिती कंपनीसाठी आतबट्ट्याचीच ठरत आहे. कंपनीचे सीईओ मोहित गोयल यांनी सांगितले की, आम्ही हॅण्डसेटचे सुटे भाग तैवानवरून मागविले आहेत. प्रत्येक हॅण्डसेटमागे ९३0 रुपये तोटा होत होता. त्यातील ७00 ते ८00 रुपयांचा तोटा अॅप डेव्हलपर्स आणि वेबसाईटवरील जाहिरांतीद्वारे भरून काढला. त्यानंतरही १८0 ते २७0 रुचा तोटा होत आहे. ( लोकमत न्यूज नेटवर्क)
७५ कोटी लोकांपर्यंत स्मार्टफोनची मोहीम
७५0 दशलक्ष नागरिकांपर्यंत २५१ रुपयांत स्मार्ट फोन पोहोचविण्याचे स्वप्न आहे. आमचा उत्पादन खर्च आणि विक्री मूल्य यात मोठी तफावत येत आहे.
ती भरून काढण्यासाठी सरकारने आम्हाला ५0 हजार कोटी रुपयांची मदत करावी. सरकारने मदत केल्यास भारताची मोठी लोकसंख्या डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग बनू शकेल, असे मोहित गोयल यांनी या पत्रात म्हटले आहे
त्या कंपनीस हवेत ५० हजार कोटी
अवघ्या २५0 रुपयांत स्मार्ट फोन देण्याचा दावा करणारी रिंगिंग बेल्स ही कंपनी ८ जुलैपासून मोबाईलची डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, ही कंपनी तोट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 02:03 AM2016-07-08T02:03:10+5:302016-07-08T02:03:10+5:30