Join us

‘सेल’चे तोट्यातील तीन प्रकल्प बंद करणार नसल्याचा कंपनीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 5:09 AM

सेलचा पश्चिम बंगालमधील अ‍ॅलॉय स्टील प्लँट (एएसपी), तामिळनाडूतील सलेम स्टील प्लँट (एसएसपी) आणि कर्नाटकातील विश्वेश्वरय्या आयर्न अँड स्टील प्लँट (व्हीआयएसपी) यांची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सरकारी मालकीच्या ‘स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड’चे (सेल) तीन स्पेशालिटी स्टील प्रकल्प तोट्यात आहेत. त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापि, योग्य खरेदीदार न मिळाल्यास हे प्रकल्प बंद केले जाणार नाहीत, असे प्रतिपादन कंपनीचे चेअरमन अनिलकुमार चौधरी यांनी केले आहे.

सेलचा पश्चिम बंगालमधील अ‍ॅलॉय स्टील प्लँट (एएसपी), तामिळनाडूतील सलेम स्टील प्लँट (एसएसपी) आणि कर्नाटकातील विश्वेश्वरय्या आयर्न अँड स्टील प्लँट (व्हीआयएसपी) यांची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.

गेल्या वित्त वर्षांत या प्रकल्पांना ३७० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या तिन्ही प्रकल्पांतील १०० टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) विभागाने गेल्या वर्षी जुलैमध्ये निविदा मागविल्या होत्या. तथापि, त्याला पुरेसा आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सल्लागार संस्था ‘एसबीआय कॅपिटल मार्केट’ने ठरविलेल्या किमतीपेक्षा खूपच कमी किंमत खरेदीदारांनी लावली आहे. त्यामुळे इरादापत्रे सादर करण्याची मुदत तीन वेळा वाढविण्यात आली होती.२०१२ मध्ये सेलने जपानच्या कोबे स्टील कंपनीशी भागीदारी करून दुर्गापूर येथील ‘एएसपी’त आयर्न नगेट्सचे उत्पादन करण्यासाठी प्रकल्प सुरू केला होता. तथापि, या प्रकल्पाची प्रगती अपेक्षेप्रमाणे झालीच नाही.

एकूण मनुष्यबळ १९७२ इतकेच्या पार्श्वभूमीवर सेलचे प्रमुख अनिलकुमार चौधरी यांनी सांगितले की, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, खरेदीदार मिळाला नाही, तरी हे प्रकल्प आम्ही बंद करणार नाही.च्सेलशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हे तिन्ही प्रकल्प मागणीनुसार चालविले जातात. तथापि, ते त्यांच्या कमाल क्षमतेपेक्षा खूपच कमी क्षमतेने चालत आहेत. तिन्ही प्रकल्पांतील मनुष्यबळ १,९७२ आहे

टॅग्स :सरकार