Success Story: भारतात नवीन स्टार्टअप्स सुरू होण्यासोबत तरुण उद्योजकांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. यातील अनेक उद्योजकांनी मोठं नाव कमावलं आहे. या यादीत मनीष डबकारा यांचाही समावेश आहे. यांची यशाची कहाणी अनोखी आहे. विशेष बाब म्हणजे हे 37 वर्षीय मनीश हे मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. 2021 मध्ये, मनीष डबकारा हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये 40 व्या क्रमांकावर होते.
ते एनकिंग इंटरनॅशनल ईकेआय एनर्जीस नावाची कंपनी चालवतात, जी पर्यावरण क्षेत्रात काम करते. भोपाळमधून इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी इंदूरमधून एमटेकचं शिक्षण घेतलं. आयआयएफएल हुरूनच्या यादीनुसार, 2023 मध्ये, मनीष डबकारा हे देशातील 13 वे सेल्फमेड श्रीमंत व्यक्ती होते. इतक्या कमी वयात त्यांनी हे स्थान कसं मिळवलं ते जाणून घेऊ.
पर्यावरण क्षेत्रात काम
मनीष डबकारा हे EKI एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी पर्यावरण क्षेत्रात काम करते. कंपनीचे 2,500 पेक्षा जास्त कॉर्पोरेट क्लायंट आहेत आणि यातील बहुतांश रिन्युएबल एनर्जी कंपन्या आहेत. त्यांचे सुमारे 70 टक्के प्रकल्प भारतात आहेत, उर्वरित 40-45 देशांमध्ये पसरलेले आहेत. आम्ही आणच्या टीमच्या आकार आणि सेवांच्या आधारे विकसनशील जगात सर्वात मोठी कार्बन कन्सल्टन्सी आहोत, असं मत मनीष डकबरा यांनी व्यक्त केलं.
6 महिन्यांत 1300 कोटी
डीएनएच्या रिपोर्टनुसार, या तरुण उद्योजकानं अवघ्या 6 महिन्यांत 1300 कोटी रुपयांची संपत्ती मिळवली होती. त्यांची सध्याची संपत्ती 3700 कोटी रुपये झाली आहे आणि ते इंदूरच्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. एप्रिल 2021 मध्ये ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स शेअर बाजारात लिस्ट झाले होते, तेव्हा त्यांच्या शेअरची किंमत 40 रुपये होती, परंतु आज त्यांच्या शेअरची किंमत साडेचारशे रुपयांच्या जवळ पोहोचलीये. म्हणजेच कंपनीनं केवळ 2 वर्षांत 10 पट परतावा दिला आहे. कंपनीत त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा 74 टक्के आहे.
मनीष डबकारा हे सर्टिफाईड एनर्जी ऑडिटर आहेत. त्यांनी आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम इंदूर येथून सर्टिफिकेशन केलंय. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीमधील मास्टर डिग्रीही आहे. ते एक क्लायमेट अॅक्टिव्हिस्टही आहेत. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी ही कंपनी सुरू केली. आज कंपनीचे 40 हून अधिक कंपन्यांमध्ये 3000 हून अधिक क्लायंट आहेत.