Lokmat Money > बिझनेस न्यूज > ही आहे सर्वाधिक नाेकऱ्या देणारी कंपनी; फोर्ब्स ‘बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स’च्या यादीत

ही आहे सर्वाधिक नाेकऱ्या देणारी कंपनी; फोर्ब्स ‘बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स’च्या यादीत

नाेकरी मिळविण्यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न असताे, की सर्वोत्तम कंपनीत आपल्याला संधी मिळायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:34 AM2023-03-15T10:34:31+5:302023-03-15T10:34:49+5:30

नाेकरी मिळविण्यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न असताे, की सर्वोत्तम कंपनीत आपल्याला संधी मिळायला हवी.

company that provides the most employees forbes best large employers list | ही आहे सर्वाधिक नाेकऱ्या देणारी कंपनी; फोर्ब्स ‘बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स’च्या यादीत

ही आहे सर्वाधिक नाेकऱ्या देणारी कंपनी; फोर्ब्स ‘बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स’च्या यादीत

नवी दिल्ली : नाेकरी मिळविण्यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न असताे, की सर्वोत्तम कंपनीत आपल्याला संधी मिळायला हवी. त्यासाठी चांगल्या कंपन्यांची शोधाशोधही होते. सर्वोत्तम रोजगारदाता कंपनी कोणती, असा प्रश्न पडतो. तर ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जारी केलेल्या अमेरिकेतील ‘सर्वोत्तम मोठ्या रोजगारदात्यां’च्या (बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स) यादीत भारतातील आयटी कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’चा (टीसीएस) समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेत टीसीएसचे ४५ हजार कर्मचारी 

अमेरिकेतील आयटी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कंपन्यांत टीसीएसचा समावेश होतो. मागील ३ वर्षांत टीसीएसने अमेरिकेत २१ हजारपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अमेरिकेत टीसीएसचे ४५ हजार कर्मचारी आहेत.

फॉर्च्यूनच्या यादीतही स्थान

‘फॉर्च्यून’ नियतकालिकानेही टीसीएसला जगातील सर्वांत चांगल्या कंपन्यांच्या यादीत स्थान दिले आहे. याशिवाय ‘करियरब्लिस’ने २०२३च्या ५० सर्वाधिक आनंदी कंपन्यांच्या यादीत टीसीएसचा समावेश आहे.

भारतातील दुसरी मोठी कंपनी

बाजार भांडवलाच्या दृष्टीने टीसीएस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी आहे. कंपनीचे जगभरात ६ लाख कर्मचारी आहेत.

टीसीएसने कर्मचारी स्नेही कार्यस्थळ निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नावीन्यास प्रोत्साहन मिळाले. टीसीएस लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर सशक्त बनवते.     - सुरेश मुथुस्वामी, चेअरमन, टीसीएस, उत्तर अमेरिका

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: company that provides the most employees forbes best large employers list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा