Lokmat Money > बिझनेस न्यूज > २० हजार तरुणांना देणार ओला कंपनी प्रशिक्षण

२० हजार तरुणांना देणार ओला कंपनी प्रशिक्षण

ओला या प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कंपनीने राज्यातील २० हजार तरुणांना येत्या ५ वर्षांत प्रवासी वाहतूक व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली आहे

By admin | Published: June 24, 2017 03:05 AM2017-06-24T03:05:38+5:302017-06-24T03:05:38+5:30

ओला या प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कंपनीने राज्यातील २० हजार तरुणांना येत्या ५ वर्षांत प्रवासी वाहतूक व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली आहे

Company training for 20 thousand youths | २० हजार तरुणांना देणार ओला कंपनी प्रशिक्षण

२० हजार तरुणांना देणार ओला कंपनी प्रशिक्षण

विशेष प्रतिनिधी  
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओला या प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कंपनीने राज्यातील २० हजार तरुणांना येत्या ५ वर्षांत प्रवासी वाहतूक व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली आहे.
शासनाच्या सर्व संबंधित खात्यांनी या प्रकल्पाला योग्य ते सहकार्य करण्याचे व तीन महिन्यांत पहिला कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. योग्य कौशल्य आणि प्रशिक्षणासंदर्भात ओलाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास मान्यता दिली.
प्रकल्पासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात बैठकही घेण्यात आली. पात्र उमेदवारांचा
शोध घेणे, त्यांना प्रशिक्षण
देऊन कौशल्य विकसित करणे, प्रशिक्षित युवकांना रोजगारासाठी आवश्यक ते सहाय्य पुरविणे या संदर्भात बाबींची रूपरेषा बैठकीत ठरविण्यात आली.

Web Title: Company training for 20 thousand youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.