नवी दिल्ली : दुबईत मालमत्ता खरेदी करण्यासाठी जगभरातील श्रीमंत लोक स्पर्धा करीत असून त्यामुळे दुबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात सात वर्षांच्या मंदीनंतर अभूतपूर्व तेजी आली आहे.
दुबईतील मानवनिर्मित बेट ‘पाम जुमैरा’वर नाचणारी लेझर किरणे नवा बांधकाम प्रकल्प सुरू होण्याचा संकेत देतात. या द्वीपसमूहावर ‘कोमो रेसिडेन्स’ नावाची सर्वाधिक उंच इमारत उभारली जात आहे.
७१ मजली उंच आणि ७६ पेंटहाऊस असणाऱ्या या प्रकल्पातील सर्वाधिक स्वस्त घराची किंमत ५७ लाख डॉलर (४६.५ कोटी रुपये) आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे.
२००८ मध्ये केला मंदीचा सामनादुबईतील वास्तव संपदा बाजारात २००८ मध्ये मंदी आली होती. अनेक विकासक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. तेलाच्या किमती घसरल्यामुळे तब्बल सात वर्षे मंदी राहिली. २०१४ मध्ये स्थिती बदलली. हळूहळू तेजी येत गेली. आता स्थिती इतकी बदलली आहे की, विकासक इमारत उभी राहण्याच्या आधीच खरेदीदारांकडून ॲडव्हान्स पेमेंट घेऊ लागले आहेत.
जोखिम वाढलीमालमत्ता संस्था ‘कोअर’च्या संशोधन प्रमुख प्रत्युषा गुर्रापू यांनी सांगितले की, जगभरातील श्रीमंतांकडून येणाऱ्या पैशामुळे आमिरातीचा वास्तव संपदा बाजार तगला आहे. मात्र, त्यामुळे मालमत्ता खरेदीदारांची जोखीम वाढली आहे. कारण विकासक आपल्या क्षमतांपेक्षा अधिक प्रकल्प हाती घेताना दिसून येत आहेत.