नवी दिल्ली : डबघाईला आलेली सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाचीटाटा समूहाने खरेदी केली. या व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘महाराजा’च्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे.
टाटा सन्सची मालकी असलेल्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एअर इंडिया खरेदीसाठी बोली लावली होती. एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्विसेसच्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली १८ हजार कोटी रुपयांची बोली विजयी ठरली होती. त्यानंतर आता एअर इंडिया आणि संबंधित उपकंपन्यांच्या भागभांडवली खरेदीच्या प्रक्रियेला स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली आहे.