Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांसाठी कम्पोझिशनची तरतूद

जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांसाठी कम्पोझिशनची तरतूद

कृष्णा, जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांना कम्पोझिशन स्कीमची तरतूद काय आहे का?

By admin | Published: June 5, 2017 12:26 AM2017-06-05T00:26:55+5:302017-06-05T00:26:55+5:30

कृष्णा, जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांना कम्पोझिशन स्कीमची तरतूद काय आहे का?

Composition Provision for Small Businesses in GST | जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांसाठी कम्पोझिशनची तरतूद

जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांसाठी कम्पोझिशनची तरतूद

-सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांना कम्पोझिशन स्कीमची तरतूद काय आहे का?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, होय. जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये
म्हणून जीएसटीच्या कर दराप्रमाणे
कर भरण्याऐवजी उलाढालीवर
कर भरता येईल. त्याप्रमाणे
कर भरायचा का नाही, हे ऐच्छिक आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी कायद्यात कम्पोझिशन स्कीममध्ये कोणाला जाता येईल?
कृष्ण : अर्जुना, जीएसटी कायद्याच्या तरतुदी अनुसार खालील व्यक्तींना कम्पोझिशन स्कीममध्ये कर भरता येईल. १) जर मागील आर्थिक वर्षात ५० लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल (अग्रीमेंट टर्नओव्हर) असेल २) जर वस्तू किंवा सेवा जीएसटीच्या पुरवठ्यामध्ये येत असेल ३) या व्यक्तीला आंतरराज्यीय वस्तू
किंवा सेवा याची खरेदी करता येणार नाही. ४) इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आॅपरेटरद्वारे पुरवठा करता येणार
नाही.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी कायद्यात कम्पोझिशन टॅक्स दर काय असेल?
कृष्ण : अर्जुना, कम्पोझिशन स्कीमच्या तरतुदीनुसार उत्पादकाला सीजीएसटी व एसजीएसटी मिळून २ टक्के, रिटेलरला सीजीएसटी व एसजीएसटी मिळून १ टक्का व हॉटेलला सीजीएसटी व एसजीएसटी मिळून ५ टक्के जीएसटी भरावा लागेल. उदा. स्टेशनरी विक्रेत्याची वार्षिक उलाढाल जर ३० लाख रु. असेल तर रिटेलर सीजीएसटी ०.५ टक्के व एसजीएसटी ०.५ टक्के असे एकूण ३० हजार रुपये भरावे लागतील.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये कम्पोझिशन स्कीमच्या अटी कोणत्या?
कृष्ण : अर्जुना, कम्पोझिशन स्कीममध्ये असलेल्या करपात्र व्यक्तीला विक्री करताना जीएसटी ग्राहकाकडून घेता येणार नाही. तसेच करदात्याने खरेदी करताना वस्तू किंवा सेवावरील भरलेल्या जीएसटीची वजावट (आयटीसीचा सेट आॅफ) घेता येणार नाही.
अर्जुन : कृष्णा, करपात्र व्यक्तीला तीन व्यावसायिक कार्यक्षेत्रापैकी एका व्यावसायिक कार्यक्षेत्रासाठी, कम्पोझिशन स्कीमचा पर्याय निवडता येईल का?
कृष्ण : अर्जुना, नाही. एकच पॅन क्रमांक असलेल्या व्यक्तीला विविध व्यावसायिक कार्यक्षेत्र किंवा नोंदणीकृत व्यवसाय या सर्वांना कम्पोझिशन स्कीम लागू होते. उदा. जर एक पॅन असलेल्या व्यक्तीचा औषधी व मोबाइल विकण्याचा असे दोन वेगवेगळे व्यवसाय असेल तर त्याला दोन्ही व्यवसायांसाठी कम्पोझिशनमध्ये जावे लागेल. मोबाइलसाठी कम्पोझिशन व औषधीसाठी दुसरा पर्याय निवडता येणार नाही.
अर्जुन : कृष्णा, कम्पोझिशन करदात्याला या योजनेत जाण्यासाठी काय करावे लागेल?
कृष्ण : अर्जुना, जीएसटी लागू झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत करदात्याला इलेक्ट्रॉनिकली अर्ज दाखल करावा लागेल. करदात्याला विक्री करताना जीएसटी आकारता येणार नाही. तसेच करदात्याला बिल आॅफ सप्लाय ग्राहकाला द्यावे लागेल. व त्यामध्ये ‘कम्पोझिशन करपात्र व्यक्ती, पुरवठ्यावर कर गोळा न करणारी व्यक्ती’ असे नमूद करावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, कम्पोझिशन करदात्याला रिटर्न केव्हा भरावा लागेल?
कृष्ण : अर्जुना, कम्पोझिशनमध्ये असणाऱ्या करदात्याला तीन महिने संपल्यानंतर पुढील महिन्याच्या १८ तारखेला आधी फॉर्म जीएसटीआर ४ ए मध्ये रिटर्न दाखल करावे लागेल. तसेच या करदात्याला वार्षिक रिटर्न आर्थिक वर्ष संपल्यानंतर ३१ डिसेंबरच्या आधी दाखल करावे लागेल.
>अर्जुन : कृष्णा, करदात्याने
यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक करदात्याने आपल्या व्यवहाराचा प्रकार लक्षात घेऊन कम्पोझिशन स्कीमचा पर्याय निवडावा. यामध्ये करदात्याला विक्रीकर गोळा करता येणार नाही व खरेदीवरचा सेट आॅफ घेता येणार नाही. कर कोणत्याही प्रकारे भरावा लागेल. प्रत्येक लहान करदात्याने यानुसार हिशोब करून कम्पोझिशन स्कीमचा निर्णय घ्यावा.

Web Title: Composition Provision for Small Businesses in GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.