- शरद गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण चुकून तसे झाले आणि लॉकडाउन लावल्याने तुम्हाला घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची वेळ आली तरी यंदा संगणक, प्रिंटर वा सुट्या भागांची टंचाई भासणार नाही वा त्यांच्या किमतीही वाढणार नाहीत.
संगणक उद्योगाशी संबंधितांचे म्हणणे आहे की गेल्या दीड वर्षांत या उपकरणांच्या किमती ३० ते टक्क्यांनी वाढल्या आहेत. वर्क फ्रॉम होममुळे त्यांची मागणी खूप वाढली होती. तसेच त्यासाठीचा बराचसा कच्चा माल चीन व तैवानहून येण्यात असंख्य अडचणी येत होत्या. संगणकाचे मॉनिटर व प्रोजक्टर करणाऱ्या बेंक्यू इंडिया या अग्रणी कंपतीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंह म्हणाले की, सध्या चिपच्या टंचाई जाणवत आहेच. शिवाय चीन व तैवान येथून आणण्याचा खर्चही वाढला आहे. जिथे ४० फूट कंटेनरसाठी ४०० डॉलर द्यावे लागत, तिथे आता ६००० डॉलर मोजावे लागत आहेत. तरीही माल येण्यास २१ ते २२ दिवस लागत आहेत.
आता घरून काम करताना लोकांना अधिकाधिक वेळ संगणकासमोर घालवावा लागतो. त्यामुळे आता डोळ्यांना त्रास होणार नाही, असे मॉनिटर बनवावे लागत आहेत. त्यामध्ये ऑटो ब्राइट, ब्लू लाइट कंट्रोल, फ्लीकर फ्री अशी फिचर्स देणे गरजेचे झाले आहे. मात्र वर्क फ्रॉम होम सुरू झाले तरी यांच्या किमतींमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. बहुतांशी लोकांनी या वस्तू आधीच घेतल्या आहेत त्यामुळे किमतीत बदलाची शक्यता नाही.
प्रोजेक्टर विकत घेण्यास प्राधान्यया बदलांमुळे १४ वा १५ इंच मॉनिटरची मागणी घटली असून, २४ ते २७ इंची मॉनिटरच्या मागणीत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. थिएटरमध्ये जाण्याऐवजी लोक प्रोजेक्टर विकत घेतात आणि क्रिकेट, फूटबॉलपासून नव्या चित्रपटांपर्यंत सारे घरीच पाहतात. त्यामुळे प्रोजक्टरच्या किमतीही ३० हजारांपासून ५ लाखांपर्यंत झाल्या आहेत.