संयुक्त राष्ट्र : देशांतर्गत बाजारपेठेत निर्यातीपेक्षा भारतात काम्प्युटर सेवा बाजारात अधिक वृद्धी होईल, असा अंदाज संयुक्त राष्टÑ व्यापार आणि विकास परिषदेच्या (अंकटाड) अहवालात करण्यात आला आहे. डिजिटल भारत आणि देशभरात स्टार्टअपसाठी पूरक वातावरणामुळे भारतीय बाजारपेठेला उभारी मिळण्याची अपेक्षाही यात व्यक्त करण्यात आली आहे.
भारतात काम्प्युटर सेवा उद्योगाचे देशांतर्गत बाजाराची गरज भागविण्यात योगदान वाढत आहे. तसेच यादृष्टीने निर्यातीतून मिळालेल्या अनुभवाचा फायदा होत आहे. याशिवाय निर्यातील अधिक विसंबून राहण्याचे प्रमाणही कमी होत आहेत. २०१० ते २०१७ दरम्यान ढोबळ राष्टÑीय उत्पादनात (जीडीपी) माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्र वृद्धी दृष्टीने हिस्सेदारीच्या दृष्टीने भारत चौथ्या स्थानी आहे. भारतात कम्प्युुटर सेवेच्या देशांतर्गत बाजारात निर्यातीच्या तुलनेत जोरदार वृद्धी होईल, असा अंदाज आहे. या क्षेत्राला डिजिटल भारत, स्टार्टअप, गुंतवणूक आणि सूक्ष्म-लघु-मध्यम क्षेत्रात काम्प्युटरचा होता असलेला वाढता वापर याचे पाठबळ मिळत आहे, असे अंकटाडच्या अहवालात म्हटले आहे.