प्रसाद गो. जोशीजगभरामध्ये वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण, त्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले अस्थिरतेचे वारे, अमेरिकेसह युरोपातील देशांमध्ये असलेले अर्थव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण आणि महिन्याच्या अंतिम सप्ताहामध्ये नफा कमाविण्यासाठी झालेली मोठी विक्री यामुळे गेले सहा सप्ताह सातत्याने वाढत असलेल्या शेअर निर्देशांकांच्या वाढीला ब्रेक लागला.
मुंबईशेअर बाजारामध्ये गतसप्ताहाचाही प्रारंभ वाढीव पातळीवर झाला. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक ३८,६१७.०३ ते ३७,४३१.६३ अंशांदरम्यान हेलकावत राहिला. मात्र सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये झालेल्या विक्रीमुळे संवेदनशील निर्देशांक ३८ हजारांची पातळी राखू शकला नाही. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही एक टक्क्याने घट झाली असली तरी हा निर्देशांक ११ हजार अंशांची पातळी राखू शकला, हे विशेष. सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १३११.३२ कोटी रुपयांची विक्री केली असली तरी जुलै महिन्यामध्ये या संस्थांनी २४९०.१९ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. देशी वित्तसंस्थांनीही सप्ताहामध्ये २४४५.४१ कोटी रुपयांची विक्री केली. अमेरिकेमध्ये वाढलेली बेकारांची संख्या, तेथील अर्थव्यवस्थेची सुधारण्याची कमी असलेली गती आणि युरोपियन युनियनने दिलेले मोठे आर्थिक पॅकेज यामुळे बाजारामध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.महिन्यात सात टक्के वाढच्जुलै महिन्यामध्ये संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टीमध्ये सुमारे सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये झालेली वाढ लक्षणीय आहे. याशिवाय विविध क्षेत्रीय निर्देशांकांपैकी फार्मा निर्देशांकामध्ये वाढ झाली. गेल्या चार महिन्यांतील या निर्देशांकाची घोडदौड सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे.