Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाचा विकासदर ६.८ टक्के होण्याची अपेक्षा; मूडीजने भारताच्या GDP बाबत व्यक्त केला अंदाज

देशाचा विकासदर ६.८ टक्के होण्याची अपेक्षा; मूडीजने भारताच्या GDP बाबत व्यक्त केला अंदाज

चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीने सर्व अंदाज चुकल्याचे दिसत आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:11 PM2024-03-04T15:11:14+5:302024-03-04T15:19:03+5:30

चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीने सर्व अंदाज चुकल्याचे दिसत आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के होता.

Confidence in economic growth rate of 6.8 percent in 2024; Moody's estimates India's GDP | देशाचा विकासदर ६.८ टक्के होण्याची अपेक्षा; मूडीजने भारताच्या GDP बाबत व्यक्त केला अंदाज

देशाचा विकासदर ६.८ टक्के होण्याची अपेक्षा; मूडीजने भारताच्या GDP बाबत व्यक्त केला अंदाज

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने २०२४ वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीने सर्व अंदाज चुकले आहेत. मूडीजने ही आकडेवारी जाहीर केली आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के होता. 

मूडीज इन्व्हेस्टर्सच्या अहवालानुसार, सरकारी भांडवली खर्च आणि मॅन्युफॅक्चरिंग इक्विटीमध्ये वाढ झाल्यामुळे २०२३ मधील वाढ उत्कृष्ट आहे. जागतिक संकट कमी झाल्यानंतर, भारतीय अर्थव्यवस्था सहज ६ ते ७ टक्के दराने वाढू शकते. भारतीय अर्थव्यवस्था २०२३ मध्ये अपेक्षेपेक्षा चांगली वाढली आहे, त्यानंतर आम्ही २०२४ साठी ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ मध्ये जीडीपी वाढीचा दर ६.४ टक्के असण्याचा अंदाज आहे.

सेकंड हँड का असेना, घेणार स्वत:चीच कार! १० वर्षांत जुन्या गाड्यांचा बाजार होणार १०० अब्ज डॉलर्सचा

मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर ते डिसेंबर या तिमाहीत दिसलेले उत्कृष्ट वाढीचे आकडे पाहता, उच्च-फ्रिक्वेंसी निर्देशक हे संकेत देत आहेत. यात  जानेवारी-मार्च तिमाहीतही ही गती कायम राहू शकते. उत्कृष्ट जीएसटी संकलन, वाहन विक्रीतील वाढ, ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणे, पत वाढीतील दुहेरी अंकी उडी हे सूचित करतात की ग्राहकांचा उपभोग आणि मागणी यांच्यात संघर्ष आहे. सपसाई बाजूने उत्पादनाचा विस्तार आणि सेवा पीएमआय आर्थिक विकासात सतत गती दर्शवत आहेत.

मूडीजच्या मते, या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी ११.१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी जीडीपीच्या ३.४ टक्के आणि २०२३-२४ पेक्षा १६.९ टक्के अधिक आहे. 

Web Title: Confidence in economic growth rate of 6.8 percent in 2024; Moody's estimates India's GDP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.