Lokmat Money > बिझनेस न्यूज > फोक्स वॅगनचा घोटाळा, प्रदुषण चाचणीत १ कोटी गाड्यांमध्ये फेरफार केल्याची कबुली

फोक्स वॅगनचा घोटाळा, प्रदुषण चाचणीत १ कोटी गाड्यांमध्ये फेरफार केल्याची कबुली

जर्मनीतील ख्यातनाम कारकंपनी फोक्स वॅगनने जगभरातील १ कोटीहून अधिक डिझेल गाड्यांमध्ये प्रदुषण चाचण्यांमध्ये फेरफार करु शकतील अशी उपकरणं लावल्याची कबुली दिली आहे.

By admin | Published: September 22, 2015 07:51 PM2015-09-22T19:51:56+5:302015-09-22T19:51:56+5:30

जर्मनीतील ख्यातनाम कारकंपनी फोक्स वॅगनने जगभरातील १ कोटीहून अधिक डिझेल गाड्यांमध्ये प्रदुषण चाचण्यांमध्ये फेरफार करु शकतील अशी उपकरणं लावल्याची कबुली दिली आहे.

Confirmation that the fox wagon scam, pollution test has been modified in 1 crore trains | फोक्स वॅगनचा घोटाळा, प्रदुषण चाचणीत १ कोटी गाड्यांमध्ये फेरफार केल्याची कबुली

फोक्स वॅगनचा घोटाळा, प्रदुषण चाचणीत १ कोटी गाड्यांमध्ये फेरफार केल्याची कबुली

ऑनलाइन लोकमत 

फ्रँकफर्ट, दि. २२ - जर्मनीतील ख्यातनाम कारकंपनी फोक्स वॅगनने जगभरातील १ कोटीहून अधिक डिझेल गाड्यांमध्ये प्रदुषण चाचण्यांमध्ये फेरफार करु शकतील अशी उपकरणं लावल्याची कबुली दिली आहे. मात्र याचा फटका कंपनीच्या शेअर्सला बसला असून या नवीन खुलाश्यानंतर कंपनीच्या शेअर दरात तब्बल २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून फोक्स वॅगनवर प्रदुषण चाचण्यांमध्ये फेरफार करणारे 'पॉल्यूशन चिटींग डिव्हाईस' लावल्याचा आरोप होत आहे. आता कंपनीनेच याची कबुली दिल्यानंतर जगभरात फॉक्स वॅगनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अमेरिकापासून ते फ्रान्स, दक्षिण कोरियापर्यंत अशा अनेक देशांनी फोक्स वेगनविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्यातील चौकशी दरम्यान येणा-या खर्चाची भरपाई करण्यासाठी कंपनीने ६.५ अब्ज युरोजची तरतूद केली आहे. 

फोक्स वेगनने एका सॉफ्टवेअरच्या मदतीने डिजेल गा़ड्यांमधून होणा-या प्रदुषणाची खोटे आकडेवारी समोर केली होती. तपासणी दरम्यान गाडीतून होणा-या उत्सर्जनाचा आकडा कमी दाखवला व यामुळे गाडीतून अत्यल्प प्रदुषण होत असल्याचे दिसले. मात्र प्रत्यक्षात गाडी जेव्हा रस्त्यावर धावायची त्यावेळी गाडीतून नियमापेक्षा ४० पट अधिक नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन होत होते. 

फोक्स वॅगनमधील या घोटाळ्याचा कंपनीला मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. सोमवारी फ्रँकफर्ट शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सचे दर १७ टक्क्यांनी घसरले होते. तर मंगळवारी शेअर्सचे दर थेट २३ टक्क्यांनी घसरले आहेत. 

Web Title: Confirmation that the fox wagon scam, pollution test has been modified in 1 crore trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.