जुलै महिन्यात आयटीआर रिटर्न करण्यासाठी अनेकांची गडबड सुरू असते. अनेकांना आयटीआरबाबत मेसेजही येत आहेत. या संदेशांद्वारे, करदात्यांना त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही कमतरता असल्याची माहिती दिली जात आहे आणि ही चूक सुधारण्यासाठी एक लिंक देखील पाठविली जात आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आयकर रिटर्न भरल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? जाणून घ्या काय आहे प्रोसेस
आयकर विभागाने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै दिली होती. आता सोशल मीडियासह आपल्या मोबाईलर याबाबत अनेक माहिती व्हायरल होत आहेत.यात ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे, असं दिले आहे. आयटीआर बाबत मेसेजही येत आहेत. या मेसेजमध्ये करदात्यांना कागदपत्र कमी असल्याच सांगण्यात येत असून त्यात एक लिंकही देण्यात येत आहे.
तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्या लिंकवर क्लिक करु नका. अशा लिंकवर क्लिक केल्याने तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. हा आयटीआरच्या नावाखाली घोटाळेबाजांनी पाठवलेली लिंक आहे.
आयटीआर भरण्याची शेवटची मुदत
अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेबाबत प्राप्तिकर विभागाने कोणतेही नवीन अपडेट जारी दिलेले नाही. आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. दरम्यान, जर तुम्ही एखाद्या अधिसूचनेबद्दल संभ्रमात असाल तर ३१ ऑगस्टची ही अधिसूचना बनावट आहे. प्राप्तिकर विभागाने अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.
आयकर विभागाने पीआयबी फॅक्ट चेकची पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. यामध्ये आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवण्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच आयकर विभागानेही आयटीआर भरण्याची तारीख वाढवली नाही यावर शिक्कामोर्तब केले आहे.
७.२८ कोटींहून अधिक ITR दाखल
आयटीआर फाइलिंग डेटाबाबतही माहिती प्राप्तिकर विभागाकडून देण्यात आली आहे. २०२४-२५ साठी ३१ जुलै, २०२४ पर्यंत ७.२८ कोटी पेक्षा जास्त ITR दाखल करण्यात आले, मागील वर्षी म्हणजेच २०२३-२४ मध्ये ६.७७ कोटी ITR दाखल केले होते.