Join us

इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर काँग्रेसचा हल्ला, दुचाकीला पुष्पहार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 6:20 AM

सोनिया गांधींनी उपस्थित केला मनरेगाचा मुद्दा, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नवी दिल्लीत काँग्रेसची निदर्शने

शीलेश शर्मा नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलचे दर आणि अन्य मुद्द्यांवर काँग्रेसने मोदी सरकारवर चौफेर हल्ला करत सरकारला सभागृहात आणि बाहेरही घेरण्याचा प्रयत्न केला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभेत मनरेगाचा मुद्दा उपस्थित करत निधी वाढविण्याची मागणी केली. तर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसद सदस्यांसह पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती, महागाई या मुद्द्यावरुन धरणे धरले. देशात या मुद्द्यावरुन पक्ष आंदोलन करेल, अशी घोषणाही त्यांनी केली. 

मनरेगाचा मुद्दा उपस्थित करत सोनिया गांधी म्हणाल्या की, यासाठीच्या निधीमध्ये सतत कपात करण्यात येत आहे. यावर्षी मनरेगाचे बजेट २०२०च्या तुलनेत ३५ टक्के कमी आहे. तर, बेरोजगारी सतत वाढत आहे. 

१० दिवसांत ९ वेळा वाढ पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गत १० दिवसात ९ वेळा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. याचा थेट फटका गरीब आणि मध्यमवर्गाला बसत आहे. ते म्हणाले की, इंधनाचे दर वाढत असल्याने महागाई वाढत आहे. हे दर सरकारने नियंत्रित ठेवावे.

इंधन दरवाढ : पत्रकारावर बाबा रामदेव भडकले

करनाल : पेट्राेल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याेगासने करून फिटनेसचा फंडा देणारे याेगगुरू बाबा रामदेव इंधन दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारावर भडकले. संतापाच्या भरात त्यांनी पत्रकारला ‘गप्प बस, नाही तर चांगले हाेणार नाही’, अशी धमकीही दिली.बाबा रामदेव यांनी जनतेला जास्त परिश्रम करण्याचा सल्लाही दिला. महागाई कमी झाली पाहिजे, असे मलाही वाटते, पण लोकांनी जास्त मेहनत करायला हवी. 

टॅग्स :राहुल गांधीकाँग्रेसइंधन दरवाढ