Lokmat Money > बिझनेस न्यूज > बांधकाम उपकरण उद्योग दुप्पट वाढणार

बांधकाम उपकरण उद्योग दुप्पट वाढणार

नरेंद्र मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी बांधकाम उपकरण उद्योग सज्ज असून २०२० पर्यंत हा उद्योग दुप्पट होऊन पाच अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

By admin | Published: November 24, 2015 11:49 PM2015-11-24T23:49:04+5:302015-11-24T23:49:04+5:30

नरेंद्र मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी बांधकाम उपकरण उद्योग सज्ज असून २०२० पर्यंत हा उद्योग दुप्पट होऊन पाच अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Construction equipment industry will double | बांधकाम उपकरण उद्योग दुप्पट वाढणार

बांधकाम उपकरण उद्योग दुप्पट वाढणार

बंगळुरू : नरेंद्र मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी बांधकाम उपकरण उद्योग सज्ज असून २०२० पर्यंत हा उद्योग दुप्पट होऊन पाच अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सीआयआयचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि एक्सकॉलचे चेअरमन विपीन सोंधी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमात देशांतर्गत बांधकाम उपकरण उत्पादनाचा वाटा मोठा असेल. सध्या हा उद्योग २.८ अब्ज डॉलरचा आहे. त्यात २०२० पर्यंत वाढ होऊन तो पाच अब्ज डॉलरचा होईल. एवढी क्षमता त्यात निश्चितच आहे.
एक्सकॉन एक आंतरराष्ट्रीय बांधकाम उपकरण व तंत्रज्ञानविषयक मेळावा आहे. बुधवारपासून येथे या मेळाव्यास प्रारंभ होत आहे. या मेळाव्यात २२ देशातील जवळपास २०० कंपन्या भाग घेत आहेत. दक्षिण आशियातील अशा प्रकारचा सर्वात मोठा मेळावा आहे.
या उद्योगाजवळ असलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांत बांधकाम व्यवसायात मंदी चालू आहे; पण ही मंदी संपून त्याला तेजी येण्याची आशा आहे. विद्यमान सरकारने योजलेल्या उपायामुळे त्यात तेजी येईल आणि २०२० पर्यंत या उद्योगात भरभराट होईल, असा कयास आहे.
सोधी म्हणाले की, वृद्धीतील घसरण थांबली आहे. विशेषत: रस्त्यांच्या निर्मितीवर या सरकारने भर दिल्याने बांधकाम उपकरण
विभागास चांगले दिवस येणार हे निश्चित. (वृत्तसंस्था)

Web Title: Construction equipment industry will double

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.