नाशिक : पंचवटीतील जुने फ्लॅट विकण्यासाठी विश्वासाची परंपरा जपणार्या नाशिकमधील जुन्या व नव्या व अग्रणी अशा निर्माण ग्रुपने पुढाकार घेतला असल्याची माहिती या समूहाचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार यांनी दिली.
ते म्हणाले, निर्माण ग्रुपच्या चार गृहप्रकल्पांची सध्या पंचवटी परिसरात उभारणी सुरू आहे. पंचवटीतील बर्याच रहिवाशांना आपली जुनी राहती घरे विकली जात नाहीत म्हणून नव्या प्रशस्त घरांमध्ये राहायला जाता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी जुनी घरे घेऊ इच्छिणारा वर्ग६गी मोठ्या प्रमाणावर आहे. या दोघांची एका व्यासपीठावर भेट घालून दिल्यास त्यांचे स्वप्न पूर्ण होईल हे जाणून निर्माण उपवन या काळाराम मंदीरासमोर असलेल्या मोठ्या गृहप्रकल्पाच्या प्रशस्त कोर्टयार्डमध्ये पंचवटीतील जुन्या घरांच्या खरेदी-विक्रीच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
यामध्ये खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये कुठलेही कमिशन द्यावे लागणार नाही. जेन्युईन खरेदी-विक्रीदारांना या एकदिवसीय मेळाव्यात नावनोंदणी करुन मोफत सहभाग घेता येईल. रविवारी (दि.२५) होणार्या या मेळाव्यासाठी एक दिवस अगोदरपर्यंत नावनोंदणी करता येईल. त्यांना मोफत टेबलस्पेस, जागेच्या माहिती व विक्रीच्या किंमतीच्या अपेक्षा नमूद केलेला प्लेकार्ड बोर्ड देण्यात येईल या मेळाव्यात ब्रोकर वा मध्यस्थास मात्र भाग घेता येणार नाही असे पोद्दार यांनी नमूद केले.
पंचवटी भागातील जुन्या घरांच्या खरेदीदारांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचून त्यांना या मेळाव्यात आमंत्रित केले जाणार आहे. या दोन्ही घटकांच्या एकत्र येण्यामुळे घेणार्याला हवे तसे घर व विकणार्याला हवे तसे घर व विकणार्याला मनाजोगती किंमत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खरेदीविक्री व्यवहारातून निर्माण ग्रुपला कुठलाही आर्थिक फायदा अपेक्षित नाही व झालेल्या सर्व व्यवहारांची कायदेशीर जबाबदारी खरेदीविक्रीदारांवर असणार आहे.
पंचवटीतील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर जुन्या घरांच्या या एकदिवसीय महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. (वा. प्र.)
-----
निर्माण ग्रुपतर्फे रविवारी जुनेे फ्लॅट विक्री-खरेदी मेळावा
नाशिक : पंचवटीतील जुने फ्लॅट विकण्यासाठी विश्वासाची परंपरा जपणार्या नाशिकमधील जुन्या व नव्या व अग्रणी अशा निर्माण ग्रुपने पुढाकार घेतला असल्याची माहिती या समूहाचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार यांनी दिली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 11:19 PM2016-09-20T23:19:14+5:302016-09-20T23:46:43+5:30