Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बांधकाम क्षेत्र तेजीत; मे महिन्यात एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटींचे विक्री व्यवहार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बांधकाम क्षेत्र तेजीत; मे महिन्यात एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटींचे विक्री व्यवहार

Coronavirus : एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटी रुपयांचे मालमत्ता विक्री व्यवहार. यापूर्वी सरकारच्या योजनेमुळे तुलनेनं झाले होते अधिक व्यवहार.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 07:22 PM2021-06-03T19:22:02+5:302021-06-03T19:23:42+5:30

Coronavirus : एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटी रुपयांचे मालमत्ता विक्री व्यवहार. यापूर्वी सरकारच्या योजनेमुळे तुलनेनं झाले होते अधिक व्यवहार.

The construction sector also boomed in the second wave of the Corona 11000 crore sales in MMR sector in May | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बांधकाम क्षेत्र तेजीत; मे महिन्यात एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटींचे विक्री व्यवहार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बांधकाम क्षेत्र तेजीत; मे महिन्यात एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटींचे विक्री व्यवहार

Highlights एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटी रुपयांचे मालमत्ता विक्री व्यवहार.यापूर्वी सरकारच्या योजनेमुळे तुलनेनं झाले होते अधिक व्यवहार.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. असं असलं तरी इतर महिन्यांच्या तुलनेनं कमी असला तरी एप्रिल आणि मे महिना हा बांधकाम क्षेत्रासाठी फायदेशीर ठरला आहे. 30 मे 2021 रोजी सीआरई मॅट्रिक्स प्रॉपर्टी ट्रॅकर आणि आयजीआर महाराष्ट्र कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मे 2021 मध्ये 10979 कोटी इतकी तर एप्रिल 2021 मध्ये 22,507 कोटी रूपये मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद झाली. मार्च, फेब्रुवारी आणि जानेवारी 2021 मध्ये एमएमआरमध्ये अनुक्रमो 44167 कोटी रुपये, 21696 कोटी रुपये आणि 21484 कोटी रूपये नोंदणीकृत मालमत्ता विक्रीचे व्यवहार  झाले.

मुंबईत मे 2021 मध्ये 7246 कोटी रूपये तर एप्रिल 2021 मध्ये 16250 कोटी रूपये इतकी मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद झाली. मार्च, फेब्रुवारी आणि जानेवारी या कालावधीत मुंबईत अनुक्रमे 28961 कोटी रुपये, 12989 कोटी रूपये आणि 12890 कोटी रुपयांचे मालमत्ता विक्रीचे व्यवहार  झाले. कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेचे परिणाम आणि एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र सरकारच्या मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क माफी बंद करण्याच्या निर्णयामुळे एप्रिल आणि मे 2021 मध्ये मालमत्ता विक्रीत घट दिसून आली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम

“जरी मुद्रांक शुल्कात कपात, सर्वात कमी गृहकर्ज दर, बिल्डर्स ने दिलेल्या सवलती व फ्लेक्झी पे ऑपशन्स यासारख्या घटकांनी मागील तिमाहीत रिअल इस्टेट मागणीच्या पुनरुत्थानास मदत केली. कोरोनाची दुसरी लाट गेल्या दोन महिन्यांत मालमत्ता विक्री व्यवहार कमी करण्या मागची आपत्ती ठरली. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्राणघातक असल्याने घर खरेदीदार घरगुती मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आपत्कालीन परिस्थितीत पैसे वाचवण्यासाठी अधिक सावध झाले. राज्यातील कोविड केसेस मध्ये झालेली अचानक वाढ आणि लॉकडाऊनमध्ये लागलेल्या विविध निर्बंधांमुळे या क्षेत्राला हळूहळू मंदीचा सामना करावा लागला. ज्यामुळे गती टिकविणे अत्यंत कठीण झाले. मागील तिमाहीत विक्रमी व्यवहार पाहता घर खरेदीदारांनी मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी मुद्रांक शुल्काचा लाभ घेतला होता, म्हणूनच घर खरेदीदारांच्या हितासाठी मुद्रांक शुल्क माफीबाबतच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची आम्ही सरकारला विनंती करत आहोत," अशी प्रतिक्रिया सह-संस्थापक आणि संचालक त्रिधातू रियल्टी आणि क्रेडाई एमसीएचआयचे सचिव प्रीतम चिवूकुला यांनी दिली.

मुद्रांक शुल्क पूर्ववत झाल्यापासून विक्रीत घट

“एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र सरकारने मुंबईत 5% टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रात 6% टक्के मुद्रांक शुल्क परत केल्यापासून मालमत्ता विक्रीत 50% घट झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात नोंदणीकृत विक्री ही मागील तिमाहीत नोंदणीच्या ओव्हरफ्लोमुळे आहे जेथे बर्‍याच घर खरेदीदारांनी मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी मुद्रांक शुल्काचा लाभ घेतला आणि त्यांची मालमत्ता नंतर नोंदविली. महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क भरण्यास परवानगी दिली होती व नंतर मालमत्ता नोंदणी करण्यास चार महिन्यांची मुदत दिली. कोरोनाची दुसरी लाट, लॉकडाऊनचे निर्बंध आणि आर्थिक कार्य ठप्प पडल्यामुळे खरेदीदारांनी याकडे पाठ फिरवली. आम्ही आधीपासूनच स्टॅम्प ड्यूटी बूस्टरचा सकारात्मक परिणाम पाहिला आहे, ज्यामुळे शहरातील घरांच्या मागणीस मागील तिमाहीत लक्षणीय वाढ दिसून आली. आम्ही मार्च 2022 पर्यंत त्यावर फेरविचार व आणखी एका वर्षासाठी ते कमी करण्यास विनंती करत आहोत. घर खरेदीदारांमध्ये अजूनही मागणी आहे आणि राज्यात अनलॉक झाल्यावर ही संख्या हळूहळू वाढेल असा आमचा विश्वास आहे," असं नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक मोहनानी म्हणाले.
 

Web Title: The construction sector also boomed in the second wave of the Corona 11000 crore sales in MMR sector in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.