वॉशिंग्टन : एच-१बी व्हिसाधारकांच्या वैवाहिक जोडीदारांना कार्य परवाने देण्याचे धोरण सुरूच ठेवण्याची मागणी भारतीय-अमेरिकी काँग्रेस सदस्य प्रमिला जयपाल यांच्या नेतृत्वाखालील १३० अमेरिकी खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनास केली आहे.
बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एच-१बी व्हिसाधारकांच्या वैवाहिक जोडीदारांस अमेरिकेत काम करण्याची कायदेशीर परवानगी देण्यास सुरुवात केली होती. मात्र पुढे हे धोरण रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला. याचा फटका ७० हजार एच-४ व्हिसाधारकांना बसणार आहे. व्हिसाधारकांच्या वैवाहिक जोडीदारांना एच-४ व्हिसा देऊन कामाची परवानगी दिली जाते. याचा भारतीय आयटी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होतो.
ही सवलत सुरू ठेवण्याची मागणी करणारे एक पत्र १३० खासदारांच्या गटाने ट्रम्प प्रशासनास पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘एच-४ व्हिसाने अमेरिकी अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. तसेच हजारो वैवाहिक जोडीदारांना दिलासा दिला आहे. या जोडीदारांत महिलांची संख्या अधिक आहे. कित्येक वर्षे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना अशा प्रकारे कामापासून वंचित करणे योग्य नाही. अमेरिकेतील कर्मचाºयांच्या स्पर्धात्मकतेवर त्याचा विपरीत परिणाम होईल. (वृत्तसंस्था)
>ब्रिटनमध्ये आॅनलाइन याचिका
लंडन : राष्ट्रीय सुरक्षा नियमांचा बाऊ करून ब्रिटनचा व्हिसा नाकारण्यात आलेल्या उच्चतम कुशल भारतीय व्यावसायिकांच्या समर्थनार्थ ३० हजार जणांनी आॅनलाइन याचिकेवर स्वाक्षºया केल्या आहेत. प्राप्तिकर विवरणपत्रातील किरकोळ चुकांच्या कारणावरून ब्रिटिश अधिकाºयांनी असंख्य भारतीयांना ब्रिटनमध्ये राहण्याचा हक्क नाकारला आहे. त्यांच्यासाठी आॅनलाइन याचिकेवर स्वाक्षºया करणाºयांत युरोपीय संघातील डॉक्टर, इंजिनीअर व व्यावसायिक यांचा समावेश आहे.मूळ पाकिस्तानी असलेले नवे ब्रिटिश गृहमंत्री साजीद जावीद यांनी सांगितले की, या प्रकरणात तातडीने लक्ष घातले जाईल. चुकीच्या कारणांमुळे टिअर१ व्हिसा अर्ज नाकारला जाणे योग्य नाही. खरोखरच काही चुकीचे झाले असेल, तर त्यावर विचार केला जाईल.
वैवाहिक जोडीदारांना कार्य परवाने सुरू ठेवा, १३० अमेरिकी खासदारांची ट्रम्प प्रशासनास विनंती
एच-१बी व्हिसाधारकांच्या वैवाहिक जोडीदारांना कार्य परवाने देण्याचे धोरण सुरूच ठेवण्याची मागणी भारतीय-अमेरिकी काँग्रेस सदस्य प्रमिला जयपाल यांच्या नेतृत्वाखालील १३० अमेरिकी खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनास केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:51 PM2018-05-17T23:51:05+5:302018-05-17T23:51:05+5:30